Sunita Ahuja : सुनीता आहुजाची ‘लॉक अप २’मध्ये एन्ट्री; म्हणाली “गोविंदा खूप टेन्शनमध्ये…”
Sunita Ahuja : सुनीता व गोविंदाच्या नात्याबद्दल बऱ्याच चर्चा सुरू

Sunita Ahuja : ‘लॉक अप’चा दुसरा सीझन सुरू झाला असून, ४ वर्षानंतर हा शो प्रेक्षकांच्या भेटीस आला आहे. या शोचे सूत्रसंचालन फराह खान आणि रितेश देशमुख करत आहेत.
अभिनेता गोविंदाची पत्नी सुनीता आहुजा देखील या सीझनमध्ये एक स्पर्धक म्हणून सहभागी झाली आहे. सुनीता यांनी या शोसाठी होकार दिला असून,१५ फायनल स्पर्धकांच्या यादीत त्यांच्या नावाचा समावेश आहे.
सध्या सुनीता व गोविंदाच्या नात्याबद्दल बऱ्याच चर्चा सुरू आहेत. यादरम्यान, आपल्या वैयक्तिक आयुष्यावर कोणीही कमेंट केली तर आपण सहन करणार नाही, असं तिने स्पष्ट केलं. सुनीता म्हणाली, “हा काही फॅमिली शो नाही, त्यामुळे माझ्या कुटुंबाबद्दल कोणीही बोललेलं मी खपवून घेणार नाही.
Huma Qureshi : “चांगली गाणी खराब करण्याची सवय”; हुमा कुरेशी ‘इश्क कमीना’च्या रिमेकमुळे ट्रोल
गोविंदा इंडस्ट्रीत खूप सीनियर असल्याने त्याच्याबद्दल कोणीही काही बोलायला नकोय, मी त्याची पत्नी आहे, मला जे वाटतं ते मी बोलू शकते, पण तिसऱ्या व्यक्तीला त्याच्याबद्दल बोलण्याचा कोणताही अधिकार नाही.” Sunita Ahuja
पुढे सुनीता म्हणाली, “गोविंदा खूप टेन्शनमध्ये होता. माझ्याशी तिथे कोणी चुकीचं वागू नये, याची त्याला खूप काळजी वाटत होती. कोणी मला दुखावू नये किंवा मला रडवू नये. पण त्याला हे माहीत नाही की त्याची पत्नी खूप खंबीर आहे, ती कुणाशीही लढू शकते.”
दरम्यान, गोविंदाचं एका मराठी अभिनेत्रीबरोबर अफेअर असल्याची चर्चा होती. तसेच दोघे वेगळे राहत असल्याचेही म्हंटले जाते. त्यामुळे गोविंदा व सुनीता यांच्या वैयक्तिक आयुष्याबद्दल पुन्हा चर्चा सुरू होणार का? हे पाहावे लागेल. Sunita Ahuja
हेही वाचा:





