Huma Qureshi : “चांगली गाणी खराब करण्याची सवय”; हुमा कुरेशी ‘इश्क कमीना’च्या रिमेकमुळे ट्रोल
Huma Qureshi : 'बेबी डू डाई डू' या सिनेमात 'इश्क कमीना' गाण्याचं नवीन व्हर्जन

Huma Qureshi : बॉलिवूडमध्ये जुन्या गाण्यांचा रिमेक करण्याचा नवा ट्रेंड सुरू आहे. याआधीही जुन्या गाजलेल्या एव्हरग्रीन गाण्यांचे रिमेक झाले आहेत. आता देखील अभिनेता शाहरुख खान आणि ऐश्वर्या राय यांच्या ‘इश्क कमीना’ या गाण्याचा रिमेक करण्यात आला आहे.
‘बेबी डू डाई डू’ या सिनेमात ‘इश्क कमीना’ गाण्याचं नवीन व्हर्जन प्रेक्षकांना पाहायला मिळणार आहे. नुकतचं हे गाणं प्रदर्शित करण्यात आलं आहे. ‘इश्क कमीना’ गाण्यामध्ये हुमा आणि रचित सिंहची केमिस्ट्रीही पाहायला मिळत आहे.
परंतु, ‘इश्क कमीना’ गाण्याचं हे नवीन व्हर्जन प्रेक्षकांना फारसं आवडलेलं नाही. चाहत्यांनी या गाण्याची तुलना जुन्या ‘इश्क कमीना’सोबत केली आहे. अनेकांनी कमेंट करत या गाण्यावर नाराजी दर्शवली आहे.
“बॉलिवूडला चांगली गाणी खराब करण्याची सवय आहे”, “एवढं वाईट गाणं यांना स्वत:ला जाणीव होत नाही का”, “शाहरुख-ऐश्वर्याची बरोबरी नाही करू शकतं”, अशा कमेंट्स चाहत्यांनी केल्या आहेत.
‘इश्क कमीना’ हे गाणं रेमो डिसुजाने कोरिओग्राफ केलं आहे. तर नचिकेत सामंतने ‘बेबी डू डाई डू’ या सिनेमाचं दिग्दर्शन केलं आहे. या सिनेमात हुमा कुरेशी, सिकंदर खेर, चंकी पांडे, रचित सिंह, विद्या मालवदे, हिमांशु मलिक हे कलाकार दिसणार आहेत. येत्या ३ जुलैला सिनेमा प्रदर्शित होणार आहे.
हेही वाचा:





