NCP News : राष्ट्रवादीच्या विलीनीकरणावरून ९० अंशांचा यू-टर्न; शरद पवारांच्या शिलेदाराने सुनावलं
NCP News : राष्ट्रवादी काँग्रेसच्या दोन्ही गटांच्या संभाव्य विलीनीकरणावरून सुरू असलेला राजकीय वाद दिवसेंदिवस अधिक तीव्र होत चालला आहे.

NCP News : राष्ट्रवादी काँग्रेसच्या दोन्ही गटांच्या संभाव्य विलीनीकरणावरून राजकीय वर्तुळात पुन्हा चर्चा सुरू झाली आहे. अजित पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांनी विलीनीकरणाच्या चर्चेचा उल्लेख केल्यानंतर दोन्ही गटांतील नेत्यांच्या वक्तव्यांमुळे संभ्रम निर्माण झाला होता. आता राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्षाचे नेते अंकुश काकडे यांनी सुनील तटकरे आणि प्रफुल्ल पटेल यांच्यावर टीका केली आहे. (NCP News)
‘तटकरे-पटेलांनी घेतला ९० अंशांचा यू-टर्न’
अंकुश काकडे यांनी सांगितले की, राष्ट्रवादी काँग्रेसच्या काही नेत्यांचा शरद पवार यांच्याशी संपर्क आहे. काही नेते सिल्व्हर ओक येथे भेटीसाठी जात आहेत. अजित पवार गटाचे आमदारही शरद पवार यांची भेट घेणार असल्याची चर्चा आहे. कदाचित दिवाळीच्या शुभेच्छा देण्यासाठी आणि त्यांच्या प्रकृतीची विचारपूस करण्यासाठी ही भेट होऊ शकते, असे त्यांनी स्पष्ट केले. (NCP News)
सुनील तटकरे आणि प्रफुल्ल पटेल यांनी यापूर्वी विलीनीकरणाबाबत कोणतीही चर्चा झाली नसल्याची भूमिका घेतली होती. मात्र, आता त्यांच्या भूमिकेत बदल झाल्याचे दिसत असल्याची टीका काकडे यांनी केली. (NCP News)
“त्यांनीच आता ९० अंशांचा यू-टर्न घेतला आहे. त्यांच्या मनात, ओठांवर आणि पोटात नेमकं काय आहे, हे मी सांगू शकत नाही,” असे काकडे म्हणाले. (NCP News)
शरद पवार गटाकडून विलीनीकरणाच्या चर्चांना पूर्णविराम?
दरम्यान, राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्षाचे सरचिटणीस सुनील माने यांनीही विलीनीकरणाच्या चर्चांवर भूमिका मांडली होती. अजित पवार यांच्या निधनानंतर दोन्ही राष्ट्रवादींच्या विलीनीकरणाचा मुद्दा संपल्याचे त्यांनी म्हटले होते. (NCP News)
शरद पवार, प्रदेशाध्यक्ष शशिकांत शिंदे आणि आमदार रोहित पवार यांनीही हा मुद्दा आमच्यासाठी संपलेला असल्याचे स्पष्ट केल्याचा दावा माने यांनी केला होता. (NCP News)
अजित पवार गटाचे आमदार शरद पवारांच्या भेटीच्या तयारीत?
दरम्यान, अजित पवार गटातील काही आमदारांनी शरद पवार यांची भेट घेण्यासाठी वेळ मागितल्याची माहिती समोर आली आहे. यापूर्वी पार्थ पवार, प्रफुल्ल पटेल आणि छगन भुजबळ यांनी शरद पवार यांची भेट घेतल्याची माहिती आहे. आता अजित पवार गटातील आमदारही भेटीसाठी इच्छुक असल्याच्या चर्चेमुळे राष्ट्रवादीच्या दोन्ही गटांतील राजकीय हालचालींकडे लक्ष लागले आहे. (NCP News)





