Sunil Narine Record : सुनील नरेनने रचला इतिहास! कायरन पोलार्डला मागे टाकत बनला आयपीएलचा ‘नंबर १’ खेळाडू
Sunil Narine Record : केकेआरचा दिग्गज अष्टपैलू खेळाडू सुनील नरेन याने वानखेडे स्टेडियमवर पाऊल ठेवताच एका ऐतिहासिक विक्रमाला गवसणी घातली आहे.

Sunil Narine Most IPL Matches Overseas Player : आयपीएल २०२६ च्या दुसऱ्याच सामन्यात कोलकाता नाईट रायडर्सचा (KKR) दिग्गज अष्टपैलू खेळाडू सुनील नरेनने वानखेडे स्टेडियमवर पाऊल ठेवताच एका ऐतिहासिक विक्रमाला गवसणी घातली आहे. मुंबई इंडियन्सविरुद्धच्या या सामन्यात मैदानात उतरताच नरेन आयपीएलच्या इतिहासातील सर्वात यशस्वी परदेशी खेळाडू ठरला आहे.
आयपीएलच्या १९ व्या हंगामात मुंबई इंडियन्स आणि कोलकाता नाईट रायडर्स यांच्यातील अटीतटीच्या लढतीला सुरुवात झाली आहे. या सामन्यात केकेआरने आपल्या प्लेइंग इलेव्हनमध्ये सुनील नरेनचा समावेश करताच, तो आयपीएलमध्ये सर्वाधिक सामने खेळणारा परदेशी खेळाडू ठरला आहे. नरेनने या बाबतीत आपलाच देशबंधू आणि मुंबई इंडियन्सचा माजी स्टार किरॉन पोलार्डचा विक्रम मोडीत काढला आहे.
सुनील नरेनने मोडला पोलार्डचा विक्रम –
Innings Break!
Half-centuries by Captain Ajinkya Rahane and Angkrish Raghuvanshi led @KKRiders‘ effort 🔝
Who bags the 2⃣ points tonight? 🤔
Scorecard ▶️ https://t.co/JmJcgsoHQ7#TATAIPL | #KhelBindaas | #MIvKKR pic.twitter.com/D6h9Tk18z5
— IndianPremierLeague (@IPL) March 29, 2026
सुनील नरेनचा हा आयपीएलमधील १९० वा सामना आहे. यापूर्वी हा मान कायरन पोलार्डकडे होता, ज्याने १८९ सामने खेळले होते. विशेष म्हणजे, नरेन आपल्या आयपीएल कारकिर्दीच्या सुरुवातीपासून केवळ केकेआरसाठीच खेळत आहे. या यादीत तिसऱ्या क्रमांकावर संयुक्तपणे एबी डिव्हिलियर्स आणि डेव्हिड वॉर्नर (दोघेही १८४ सामने) आहेत.
आयपीएलमध्ये सर्वाधिक सामने खेळणारे परदेशी खेळाडू:
- सुनील नरेन: १९० सामने*
- किरॉन पोलार्ड: १८९ सामने
- एबी डिव्हिलियर्स: १८४ सामने
- डेव्हिड वॉर्नर: १८४ सामने
- ड्वेन ब्राव्हो: १६१ सामने
२०० विकेट्सचा टप्पा खुणावतोय!
केकेआरला तीन वेळा विजेतेपद मिळवून देण्यात महत्त्वाची भूमिका बजावणाऱ्या नरेनच्या नावावर गोलंदाजीत १९२ विकेट्स जमा आहेत. या हंगामात आणखी ८ विकेट्स घेतल्यास तो आयपीएलमध्ये २०० विकेट्स घेणारा पहिला परदेशी फिरकीपटू ठरेल. फलंदाजीमध्येही त्याने १७.६२ च्या सरासरीने १७८० धावा केल्या आहेत. हार्दिक पंड्याच्या नेतृत्वाखालील मुंबई इंडियन्सच्या फलंदाजांसमोर नरेनची जादू आज चालणार का, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.





