Jemimah Gavaskar Song : ‘ये दोस्ती हम नहीं तोडेंगे…’; गावस्करांनी पाळला जेमिमाला दिलेला शब्द! पाहा VIDEO

Jemimah Gavaskar Song video viral : भारतीय महिला क्रिकेट संघाने विश्वविजेतेपदावर नाव कोरल्यानंतर संपूर्ण देशात जल्लोष झाला. मात्र, या ऐतिहासिक विजयानंतर एका खास ‘मैफली’ची सर्वांनाच प्रतीक्षा होती. भारताचे महान माजी कर्णधार सुनील गावस्कर आणि स्टार फलंदाज जेमिमा रॉड्रिग्ज यांनी विश्वचषक जिंकल्यास गाणे गाण्याचे दिलेले वचन अखेर पूर्ण झाले आहे. शुक्रवारी या दोघांची भेट झाली आणि क्रिकेटच्या मैदानात गाजलेल्या या दोन दिग्गजांची ‘म्युझिकल जुगलबंदी’ पाहायला मिळाली.
गावस्करांचे खास सरप्राईज: ‘बॅट’च्या आकाराची गिटार!
जेमिमाला संगीताची खूप आवड आहे, हे सर्वांनाच ठाऊक आहे. गावस्कर यांनी जेमिमाची भेट घेतली तेव्हा तिला एक अतिशय सुंदर आणि अनोखी भेट दिली. त्यांनी जेमिमाला ‘बॅट’च्या आकाराची गिटार भेट दिली. जेव्हा जेमिमाने गावस्करांना या गिटारचे अनावरण करण्यास सांगितले, तेव्हा गावस्कर मिश्किलपणे म्हणाले, “इथे मी सलामीचा फलंदाज नाही, तू आहेस!” हे ऐकून जेमिमासह तिथे उपस्थित असलेले सर्वच जण हसून वेडे झाले.
‘शोले’च्या गाण्यावर रंगली मैफल –
Gentlemen’s agreement ….. promises kept!!#SunilGavaskar #JemimahRodrigues pic.twitter.com/aP80HTifvb
— The Samosa Times (@Samotimes2026) January 10, 2026
गावस्कर यांनी माईक हातात घेतला आणि जेमिमाने आपली नवी कोरी बॅटरुपी गिटार हाती धरली. या दोघांनी ‘शोले’ चित्रपटातील अजरामर गाणे “ये दोस्ती हम नहीं तोडेंगे…” गायले. गावस्कर सुरात गात होते आणि जेमिमा गिटारवर साथ देत होती. या खास क्षणाचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे. जेमिमाने यावर म्हटले की, “ही तर नुसती झलक आहे, संपूर्ण गाणं लवकरच घेऊन येऊ!”
हेही वाचा – Shubman Gill : उपकर्णधारपदावरून थेट संघाबाहेर केल्याने गिलने पहिल्यांदाच सोडलं मौन; म्हणाला, निवड समितीच्या…
नेमकं काय होतं ते ‘प्रॉमिस’?
Sunil Gavaskar keeps his promise, sings with Jemimah Rodrigues#SunilGavaskar #JemimahRodrigues #WomensCricket #TeamIndia #ODIWorldCup #CricketFun #CricketMeetsMusic #IndianCricket #SportsToday #nikhilnaz pic.twitter.com/HRAwd3F0FA
— Sports Today (@SportsTodayofc) January 10, 2026
भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यातील अंतिम सामन्यापूर्वी गावस्कर यांनी एका मुलाखतीत म्हटले होते की, “जर भारतीय महिला संघाने विश्वचषक जिंकला, तर मी आणि जेमिमा एकत्र गाणे गाऊ. ती गिटार वाजवेल आणि मी गाईन.” याआधी बीसीसीआयच्या एका कार्यक्रमात या दोघांनी ‘क्या हुआ तेरा वादा’ हे गाणे गायले होते. विश्वचषक जिंकल्यानंतर जेमिमाने इन्स्टाग्रामवर व्हिडीओ शेअर करत गावस्करांना त्यांच्या वचनाची आठवण करून दिली होती.
जेमिमाने गावस्करांचे मानले आभार –
विश्वचषक विजयाचा आनंद आणि गावस्करांसोबतची ही मैफल यामुळे जेमिमा खूप खूश होती. तिने गावस्करांचे आभार मानले असून चाहत्यांनीही या आगळ्यावेगळ्या ‘जय-विराज’ (जय-वीरू) जोडीला सोशल मीडियावर भरभरून पसंती दिली आहे.





