सुनील शेट्टीचा ‘केसरी वीर’ चित्रपट पाकिस्तानात प्रदर्शित होणार नाही; निर्मात्याने स्पष्ट केली भूमिका

Suniel Shetty | बॉलीवूड अभिनेता सुनील शेट्टीने अनेक सुपरहिट चित्रपटांमध्ये काम केले आहे. आजही त्याच्या अभिनयाची जादू कायम असल्याचे पाहायला मिळते. मात्र सुनील शेट्टीचा आगामी ‘केसरी वीर : लेजेंड्स ऑफ सोमनाथ’ हा चित्रपट पाकिस्तानमध्ये प्रदर्शित होणार नाही. काश्मीरमधील पहलगाम येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर चित्रपट निर्माते कानू चौहान यांनी हा मोठा निर्णय घेतला आहे.
चित्रपटाचे निर्माते कानू चौहान यांनी एका मुलाखतीत, “काश्मीरमधील पहलगाम येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्याचा मी तीव्र निषेध करतो. आता ‘केसरी वीर’ पाकिस्तानात प्रदर्शित होणार नाही. मी हा मोठा निर्णय घेतला आहे. दहशतवादी हल्ल्यात प्राण गमावलेल्या निष्पाप मृतांना ही माझी श्रद्धांजली आहे,” असे सांगितले आहे. Suniel Shetty |
पाकिस्तान वगळता, ‘केसरी वीर’ हा चित्रपट भारत, अमेरिका, ब्रिटन आणि उत्तर अमेरिका यांसारख्या इतर आंतरराष्ट्रीय प्रदेशात प्रदर्शित होईल. ‘केसरी वीर : लेजेंड्स ऑफ सोमनाथ’ हा चित्रपट १४ व्या शतकात घुसखोरांपासून ऐतिहासिक सोमनाथ मंदिराचे रक्षण करण्यासाठी आपले प्राण अर्पण करणाऱ्या योद्ध्यांची कहाणी आहे. Suniel Shetty |
यात सूरज पंचोली, विवेक ओबेरॉय, सुनील शेट्टी आणि आकांक्षा शर्मा यांच्या प्रमुख भूमिका आहेत. ‘केसरी वीर : लेजेंड्स ऑफ सोमनाथ’ या चित्रपटाचे दिग्दर्शन प्रिन्स धीमान यांनी केले आहे. हा चित्रपट १६ मे २०२५ रोजी थिएटरमध्ये प्रदर्शित होणार आहे.
हेही वाचा
“जनतेच्या समस्या सोडवण्यासाठी…”; अजित पवारांनी तीन शिफ्टमधील सांगितले सरकारचे कामकाज





