National President : अजित पवार यांच्या निधानानंतर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा राष्ट्रीय अध्यक्ष कोण होणार याकडे सर्वांचे लक्ष लागलेले आहे. विमान अपघातात अजित पवार यांचे निधन झाले, त्यानंतर राज्यात मोठ्या आणि अनपेक्षित घडामोडी घडल्या. उपमुख्यमंत्री पदाची शपथ त्यांच्या पत्नी सुनेत्रा पवार यांनी घेतली. तर दुसरीकडे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा राष्ट्रीय अध्यक्षाबाबत बराच खल सुरू असून, लवकरच याबाबत निर्णय होणार असल्याचे सांगितले जात आहे. विधीमंडळाच्या नेतेपदी सुनेत्रा पवार यांची निवड झाल्यानंतर त्यांच्याकडेच पक्षाच्या राष्ट्रीय अध्यक्ष पदाची सूत्र असावीत, असा आग्रह पक्षातील नेत्यांकडून धरला जात आहे. या अनुषंगाने राज्यभरातील पदाधिकारी आणि जवळपास ३० आमदारांनी वरिष्ठ नेत्यांकडे पत्र पाठवून सुनेत्रा पवार यांच्या नावाला पाठिंबा दिल्याचे समजते. या पार्श्वभूमीवर जिल्हा परिषद आणि पंचायत समित्यांच्या निवडणुका झाल्यानंतर ९ फेब्रुवारीला पक्षाच्या कार्यकारणीची बैठक बोलवण्यात आली आहे. या बैठकीत राष्ट्रीय अध्यक्षाच्या नावावर शिक्का मोर्तेब होणार आहे. तसेच पक्षात अनेक फेरबदल देखील होऊ शकतात. सध्या पक्षात प्रफुल पटेल कार्यकारी अध्यक्ष आणि सुनील तटकरे प्रदेशाध्यक्ष म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. समजा सुनेत्रा पवार यांची निवड राष्ट्रीय अध्यक्षा म्हणून झाल्यास अनेक बदल देखील पक्षात होऊ शकतात. राष्ट्रीय अध्यक्षाची निवड करणे अत्यंत गरजेचे असून हे महत्वाचे पद आहे. राज्याच्या उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार लवकरच मंत्र्यालयात जाऊन पदभार स्विकारणार असून, ९ फेब्रुवारीला त्या उपमुख्यमंत्री पदाची सूत्रे मंत्रालयात जाऊन स्विकारतली, अशी शक्यता आहे. त्यांच्याकडे अर्थ खाते वगळता इतर दोन महत्वाच्या खात्यांची जबाबदारी सोपविण्यात आली आहे. हेही वाचा : Supreme Court on Meta: व्हॉट्सअॅप वापरकर्त्यांच्या डेटावरून सर्वोच्च न्यायालयाने मेटाला फटकारले ; म्हणाले,”तुम्ही लोकांसोबत खेळ..”