“करिश्मा हगवणेबरोबर सुनेत्रा पवार”; अंजलिया दमानियांकडून व्हिडिओ शेअर, सुप्रिया सुळेंचाही उल्लेख करत टीका

Anjali Damania : वैष्णवी मृत्यू प्रकरणातील तिची सासू, नवरा आणि नणंद यांना पोलिसांनी अटक केली असून, गेल्या सात दिवसांपासून फरार असणारा तिचा सासरा आणि दीराला देखील पोलिसांनी अटक केली आहे. आज पहाटे साडेचार वाजण्याच्या सुमारास बावधन पोलिसांनी अटकेची कारवाई करत पिता पुत्राला बेड्या ठोकल्या आहेत. पोलिसांनी सापळा रचून अटकेची कारवाई केली आहे.
या दोघांचे अटकेआधीचे हॅाटेलमध्ये बसून जेवतानाचे सीसीटीव्ही फुटेज समोर आले आहे. सीसीटीव्हीमध्ये राजेंद्र हगवणे आणि सुशील हगवणे हे दोघे मटणावर ताव मारताना दिसत आहेत. वैष्णवीचा सासरा राजेंद्र हगवणे आणि दीर सुशील हगवणे यांना अटक केल्यानंतर आता पूर्ण हगवणे कुटुंब अटकेत आहे. यानंतर सोशल मीडियावर राजकीय संबंधांचीविषयी चर्चा होत आहे. अशातच सामाजिक कार्यकर्त्या अंजनिया दमानिया यांनी त्यांच्या एक्स अकाऊंटवरून एक व्हिडिओ आणि त्यासोबत पोस्ट शेअर केली आहे.
हेही वाचा: हगवणे पिता-पुत्राला बेड्या; सुषमा अंधारेंनी उपस्थित केले तीन प्रश्न, महिला आयोगाबाबत म्हणाल्या…
करिश्मा हगवणे बरोबर सुनेत्रा पवार? ह्याच करिश्मा हगवणे बरोबर सुप्रिया सुळे आणि शरद पवार पण आहेत? हे पण वरवरचे संबध आहेत का? आज अजित पवार म्हणतात एका लग्नात गेलो आणि माझ्या मागे लचांड लागलं? इतक्या गंभीर विषयावर अशी भाषा ? संवेदनशील असू शकत नाहीत हे? धक्कादायक, असे प्रश्न त्यांनी पोस्टमध्ये केले आहेत.
करिश्मा हगवणे बरोबर सुनेत्रा पवार?
ह्याच करिश्मा हगवणे बरोबर सुप्रिया सुळे आणि शरद पवार पण आहेत?
हे पण वरवरचे संबध आहेत का?
आज अजित पवार म्हणतात एका लग्नात गेलो आणि माझ्या मागे लचांड लागलं? इतक्या गंभीर विषयावर अशी भाषा ? संवेदनशील असू शकत नाहीत हे?
धक्कादायक pic.twitter.com/a719tBvog5
— Mrs Anjali Damania (@anjali_damania) May 22, 2025
अंजलिया दमानिया यांनी शेअर केलेल्या व्हिडिओमध्ये राज्यसभा खासदार सुनेत्रा पवार या दुकानाच्या उद्घाटन कार्यक्रमाला गेल्याचे दिसत आहे. यामध्ये सुनेत्रा पवार यांच्यासोबत वैष्णवीची नणंद करिश्मा हगवणे असल्याचे दिसत आहे. त्यांनंतर एका फोटोत करिश्मा हगवणे व सुप्रिया सुळे दिसत आहेत. आणखी एका फोटोत शरद पवारांना भेटण्यासाठी आलेली करिश्मा हगवणे दिसत आहेत. हे फोटो आणि व्हिडिओ सोशल मीडियावर देखील व्हायरल होत आहेत.





