Sunetra Pawar : सुरांची ‘सम्राज्ञी’ काळाच्या पडद्याआड; उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवारांनी आशा भोसलेंना वाहिली श्रद्धांजली

Sunetra Pawar : ज्येष्ठ गायिका आशा भोसले यांनी 92 व्या वर्षी जगाचा निरोप घेतला. आशा भोसले यांच्या छातीत संसर्ग झाल्याने त्यांना शनिवारी रात्री उशिरा ब्रीच कँडी रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. आज आशा भोसले यांचे पुत्र आनंद भोसले यांनी आशा भोसले यांच्या निधनाची माहिती दिली.
आशा भोसले यांच्या पार्थिवावर सोमवारी 13 एप्रिल रोजी सायंकाळी 4 वाजता छत्रपती शिवाजी पार्क येथे अंत्यसंस्कार करण्यात येणार असल्याची माहिती त्यांचा मुलगा आनंद भोसले यांनी दिली.
सुनेत्रा पवार यांचे ट्वीट
उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांनी देखील आशा भोसले यांना श्रद्धांजली अर्पण केली आहे. “ज्येष्ठ गायिका आशाताई भोसले यांच्या निधनाने संगीत क्षेत्रातील एका सुवर्णयुगाचा अंत झाला असून सुरांची ‘सम्राज्ञी’ काळाच्या पडद्याआड गेली आहे. मी आशाताईंना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करते.
आशाताई भोसले यांच्या आवाजात विलक्षण माधुर्य, विविधता आणि भावनांची अप्रतिम अभिव्यक्ती होती. हिंदी, मराठीसह विविध भारतीय भाषांमधील हजारो गाण्यांमधून त्यांनी रसिकांच्या मनावर अधिराज्य गाजवले. ‘पिया तू अब तो आजा’, ‘दम मारो दम’, ‘इन आंखों की मस्ती’, ‘चुरा लिया है तुमने’ यांसारखी असंख्य गाणी आजही रसिकांच्या ओठांवर आहेत. त्यांच्या गायकीत आधुनिकतेसोबतच पारंपरिकतेचा सुंदर संगम दिसून येतो,” असे सुनेत्रा पवार यांनी ट्वीटमध्ये म्हंटले आहे. Sunetra Pawar
ज्येष्ठ गायिका आशाताई भोसले यांच्या निधनाने संगीत क्षेत्रातील एका सुवर्णयुगाचा अंत झाला असून सुरांची ‘सम्राज्ञी’ काळाच्या पडद्याआड गेली आहे. मी आशाताईंना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करते.
आशाताई भोसले यांच्या आवाजात विलक्षण माधुर्य, विविधता आणि भावनांची अप्रतिम अभिव्यक्ती होती.… pic.twitter.com/oA9TxrIM6t
— Sunetra Ajit Pawar (@SunetraA_Pawar) April 12, 2026
आशाताई भोसले यांचा संगीत प्रवास म्हणजे कठोर परिश्रम, सातत्य आणि कलेप्रति असलेल्या निष्ठेचे प्रतीक आहे. त्यांनी अनेक पिढ्यांतील श्रोत्यांना आपल्या सुरांनी मंत्रमुग्ध केले. त्यांच्या जाण्याने भारतीय संगीतसृष्टीचे मोठे नुकसान झाले आहे. आपल्या दीर्घ आणि यशस्वी कारकिर्दीत आशाताई भोसले यांना अनेक राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय पुरस्कारांनी सन्मानित करण्यात आले.
आपल्या कर्तृत्वाने संगीत क्षेत्रात त्यांनी मानाचे स्थान निर्माण केले. त्यांच्या अद्वितीय योगदानामुळे त्यांना जागतिक स्तरावरही विशेष ओळख मिळाली होती. आशाताईंच्या जाण्याने त्यांच्या कुटुंबियांना आणि असंख्य चाहत्यांना झालेले हे दुःख सहन करण्याची शक्ती मिळो, अशी प्रार्थना करते,” असे त्यांनी म्हंटले आहे. Sunetra Pawar
हेही वाचा:






