Sunetra Pawar : बीड जिल्ह्यातून समोर आलेल्या एका धक्कादायक पत्रामुळे राज्याच्या राजकारणात मोठी खळबळ उडाली आहे. या पत्रात उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांच्या जीवाला धोका असल्याचा गंभीर दावा करण्यात आला असून, हा धोका रुपाली चाकणकर यांच्याकडून असल्याचे नमूद करण्यात आले आहे. या दाव्यामुळे राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आले आहे. (Sunetra Pawar) सदर पत्र तपासासाठी विशेष तपास पथकाकडे (SIT) सुपूर्द करण्यात आले असून, त्याची सखोल पडताळणी सुरू आहे. हे पत्र केवळ खोडसाळपणातून लिहिले गेले आहे की त्यामागे काही ठोस कारण किंवा कट आहे, याचा तपास यंत्रणा बारकाईने शोध घेत आहेत. सुरक्षेच्या दृष्टीनेही या प्रकरणाकडे गांभीर्याने पाहिले जात आहे. (Sunetra Pawar) या प्रकरणावर प्रतिक्रिया देताना सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी सध्याच्या राजकारणातील अनिश्चिततेवर भाष्य केले. “आजच्या राजकारणात कधी काय घडेल, याचा काही नेम राहिलेला नाही. अशा प्रकारचे पत्र समोर आल्यास त्याची तात्काळ आणि सखोल चौकशी होणे अत्यावश्यक आहे,” असे त्या म्हणाल्या. (Sunetra Pawar) Sunetra Pawar : सुनेत्रा पवारांच्या जीवाला धोका? ‘या’ पत्रामुळे मोठी खळबळ, दमानियांची चौकशीची मागणी यावेळी त्यांनी अशोक खरात प्रकरणाचा उल्लेख करत, “जर सुनेत्रा पवार यांच्या जीवाला धोका असल्याची शक्यता व्यक्त होत असेल, तर अशोक खरात यांच्या सुरक्षेबाबतही शंका निर्माण होते,” असे मत व्यक्त केले. या संपूर्ण प्रकरणातील सत्य समोर येणे गरजेचे असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. दरम्यान, या पत्रामागील खरे कारण काय आहे, हे तपासानंतरच स्पष्ट होणार असून, तोपर्यंत राज्यातील राजकीय वातावरण तापलेले राहण्याची शक्यता आहे. (Sunetra Pawar) हेही वाचा : Devendra Fadanvis : अशोक खरात प्रकरणात मुख्यमंत्री फडणवीसांची मोठी घोषणा