Sunetra Pawar : वेळ पडल्यास उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांच्या मदतील जाऊ; ‘या’ नेत्याचे मोठे वक्तव्य
दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या निधनानंतर दोन्ही राष्ट्रवादीच्या विलीनीकरणाच्या (Sunetra Pawar) चर्चांना उधाण आले होते. अजित पवार हे दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेसच्या एकत्रीकरणासाठी आग्रही होते.

Sunetra Pawar : दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या निधनानंतर दोन्ही राष्ट्रवादीच्या विलीनीकरणाच्या (Sunetra Pawar) चर्चांना उधाण आले होते. अजित पवार हे दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेसच्या एकत्रीकरणासाठी आग्रही होते, असा दावा राष्ट्रवादी(शप) पक्षाच्या नेत्यांकडून केला जात होता. मात्र, अजित पवार यांच्या पक्षाचे नेते प्रफुल पटेल आणि सुनील तटकरे यांनी अशी कोणतीही चर्चा झाली नसल्याचे सांगत हा दावा फेटाळून लावला होता. त्यानंतर आता या चर्चां थंड होताना दिसत आहेत.
अशातच राष्ट्रवादी(शप) पक्षाचे नेते आमदार जयंत पाटील यांनी कधीही वेळ पडल्यास उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार (Sunetra Pawar) यांच्या मदतील जाऊ ,असे विधान केले आहे. जयंत पाटील म्हणाले, विलिनीकरणावरती मला भाष्य करावे वाटत नाही. शरद पवारांच्या नेतृत्वात आमचा पक्ष आहे. आमच्या पक्षाचे स्वतंत्र अस्तित्व आहे. आमचा पक्ष त्या दृष्टीने वाटचाल करेल. आम्ही कधीही तुमच्या मदतीला येऊ.
सोबतच सुनेत्रा पवार आणि पार्थ पवार यांच्यासमोर अडथळे किंवा प्रश्न निर्माण करण्याची इच्छा नाही. राजकारणामध्ये उद्या काय होईल ते आज सांगता येत नाही. आजचा दिवस, उद्या आहे का?, हे नियतीला मान्य आहे का?, असे अनेक प्रश्न आहेत.
त्यामुळे पुढे काय करायचे आमचा पक्ष आहे, पक्षाच अस्तित्व आहे, पवार साहेबांच्या सारखे मोठे व्यक्तिमत्व आहे, महाराष्ट्रात अनेक प्रश्न आहेत, शेतकऱ्यांच्या समोर अमेरिका भारत करारातून काही नवीन आव्हान निर्माण होणार आहेत. देशाच्या आर्थिक परिस्थितीचे विषय आहेत. आणखीन बरेच प्रश्न आहेत, त्यामुळे आमचा पक्ष त्या दृष्टीने विचार करेल.
तसेच, सुनील तटकरे यांचे म्हणणे आहे की, अशी काही विलनीकरणाची चर्चा झालेलीच नव्हती, त्यावरती पाटील म्हणाले, ठीक आहे, आता ज्या माणसाशी, नेत्याशी आमची चर्चा झालेली तेच नसल्यामुळे अशा विधानाला उत्तर देणेही मला आवश्यक वाटत नाही, असेही पाटील यांनी म्हटले आहे.






