Asim Sarode : महाराष्ट्राला तुम्ही मूर्ख समजता का? खरात प्रकरणावर असीम सरोदेंचा फडणवीसांना सवाल म्हणाले “तुम्ही अंधश्रद्धा…”
Asim Sarode: बहुचर्चित अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी केलेल्या विधानावरुन वकील असीम सरोदे यांनी जोरदार टीका केली आहे.

Asim Sarode : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांना राज्यात चर्चेत असलेल्या भोंदूबाबा अशोक खरात प्रकरणावर प्रश्न विचारण्यात आला. त्यावर बोलताना फडणवीस यांनी, “पहिल्यांदा त्यांचे फोटो व्हीडिओ येतात, यावरुन गोष्टी डिटरमिन करता येणार नाही. सहभाग असेल तर कारवाई होईल. कोणालाच सोडण्याचे कारण नाही, येत्या काळात आणखी कारवाई होण्याची शक्यता आहे,” असे वक्तव्य केले होते. यानंतर वकील असीम सरोदे यांनी मुख्यमंत्र्यांच्या वक्तव्यावर सोशल मीडिया एक्स या प्लॅटफॅार्मवर ट्वीट करत काही सवाल उपस्थित करत फडणवीसांवर जोरदार टीका केली आहे. Asim Sarode
वकील असीम सरोदे (Asim Sarode) यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर निशाणा साधला आहे. फडणवीसांचे खरात सोबतच्या फोटोंवरुन आक्षेप नोंदवताना, “तुम्ही अंधश्रद्धा बाळगणारे आहात,” असे मुख्यमंत्र्यांना उद्देशून ते म्हणाले आहेत. त्यामुळे अशोक खरात प्रकरणासंदर्भात बोलताना फडणवीसांनी केलेल्या वकव्यावरुन वादाला तोंड फुटले आहे.
अशोक खरात यांची ओळख सामाजिक कार्यकर्ते म्हणून होती का?, अशोक खरात शास्त्रज्ञ आहेत का?. 2004 पासून खरात हा माणूस अंकशास्त्र, ज्योतिष्य हेच करत वाढलेला आहे. कुणी सहज एखाद्या कार्यक्रमात अचानक भेटला व त्याने सोबत फोटो काढला ती गोष्ट वेगळी पण तुम्ही त्याला विशेष करून भेटायला जाता…
— Asim Sarode (@AsimSarode) March 28, 2026
उबाठा गटाच्या नेत्या सुषमा अंधारे यांनी शुक्रवारी पत्रकार परिषदेत पुन्हा एकदा खरात प्रकरणावर आक्रमक भूमिका घेतली. अनेक नेत्यांचे खरातसोबतचे फोटो दाखवून सर्व नेत्यांची चौकशी करण्याची मागणी केली. याच मुद्याला घेऊन असीम सरोदे यांनी थेट फडणवीसांना सवाल करत रोखठोक पोस्ट लिहिली आहे.
नेमकं काय म्हणाले असीम सरोदे? Asim Sarode
अशोक खरात यांची ओळख सामाजिक कार्यकर्ते म्हणून होती का? अशोक खरात शास्त्रज्ञ आहेत का? असे सवाल उपस्थित करत 2004 पासून खरात हा माणूस अंकशास्त्र, ज्योतिष्य हेच करत वाढलेला आहे. कुणी सहज एखाद्या कार्यक्रमात अचानक भेटला व त्याने सोबत फोटो काढला ती गोष्ट वेगळी पण तुम्ही त्याला विशेष करून भेटायला जाता किंवा त्याला बोलावून त्याच्यासोबत विशेष मिटिंग ठेवता आणि आता म्हणता कि, “खरातसोबत केवळ फोटो आहेत म्हणजे दोषी नाही”! व्वा ! मुख्यमंत्री साहेब…. व्वा व्वा! असा आरोप सरोदेंनी केला आहे.
पुढे ट्वीटमध्ये असीम सरोदे म्हणाले, महाराष्ट्राला तुम्ही मूर्ख समजता का? तुम्ही अंधश्रद्धा बाळगणारे आहात, तुम्ही वैज्ञानिक दृष्टिकोन बाळगावा ही संविधानिक जबाबदारी न पाळणारे आहात आणि खरात सोबत तुमचे विशेष फोटो आहेत त्यामुळे तुम्ही दोषी आहात. असे थेट आरोप असीम सरोदेंनी करत खळबळ उडवून दिली आहे. यावरुन राजकीय वर्तुळातून तीव्र प्रतिक्रिया उमटण्याची शक्यता वर्तवली जात आहे.





