Sunetra Pawar : रुपाली चाकणकरांच्या राजीनाम्यानंतर सुनेत्रा पवार अॅक्शन मोडवर; पुढील कार्यवाही सुरू…
Sunetra Pawar : सद्य परिस्थिती आणि सुरू असलेल्या चौकशीच्या पार्श्वभूमीवर रूपाली चाकणर यांनी पदाचा त्याग करण्याचा निर्णय घेतला आहे.

Sunetra Pawar : नाशिकमधील भोंदूबाबा कॅप्टन अशोक खरात याच्याशी संबंध असल्याने राज्य महिला आयोगाच्या अध्यक्ष रुपाली चाकणकर यांनी काल आपल्या अध्यक्षपदाचा राजीनामा दिला. या सर्व प्रकरणावर आणि चाकणकरांच्या राजीनाम्यावर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या अध्यक्षा आणि राज्याच्या उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांनी ट्वीट करत आपली प्रतिक्रिया दिली आहे.
सुनेत्रा पवार यांनी पोस्टमध्य लिहिले की, “महाराष्ट्र राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा श्रीमती रुपाली चाकणकर यांचा राजीनामा मला प्राप्त झाला आहे. सद्य परिस्थिती आणि सुरू असलेल्या चौकशीच्या पार्श्वभूमीवर त्यांनी पदाचा त्याग करण्याचा निर्णय घेतला आहे. Sunetra Pawar
ही चौकशी निष्पक्ष आणि पारदर्शक होण्याच्या दृष्टीकोनातून मी त्यांचा राजीनामा पुढील कार्यवाहीसाठी माननीय मुख्यमंत्री यांच्याकडे पाठवत आहे”, अशी माहिती त्यांनी पोस्टद्वारे दिली आहे. Sunetra Pawar
रुपाली चाकणकरांची प्रतिक्रिया Sunetra Pawar
माझं संपूर्ण कुटुंब हे वारकरी संप्रदायातील आहे. आमची खरातवर असणारी श्रद्धा अध्यात्मिक दृष्टीकोनातून होती. त्यामुळे खरातच्या ट्रस्टसोबत जोडले गेले. परंतु, खरातची दुसरी बाजू मला माहिती नव्हती. जे काही कृत्य घडलंय ते अत्यंत चुकीचं आहे, घाणेरडं असून त्याचं आम्ही कुठेही समर्थन करणार नाही. पोलिसांनी त्याचा तपास करुन आरोपीवर कठोर कारवाई करावी,” अशी मागणी रुपाली चाकणकरांनी केली.
माध्यमांकडून दाखवले जाणारे व्हिडीओ हे काही वर्षांपूर्वीचे आहेत. गुरुपौर्णिमोच्यानिमित्ताने पाद्यपूजा अनेकांनी केली, तशी मी आणि माझ्या पतीनेही केली. खरात पती-पत्नीला मी आणि माझ्या परिवाराने गुरु मानलं होतं. तिथे होणाऱ्या कार्यक्रमांना आम्ही उपस्थित राहायचो. यामध्ये एखाद्या व्यक्तीला आपण गुरु मानलं, त्यानिमित्ताने आम्ही कुटुंब उपस्थित राहत होतो.
महाराष्ट्र राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा श्रीमती रुपाली चाकणकर यांचा राजीनामा मला प्राप्त झाला आहे.
सद्य परिस्थिती आणि सुरू असलेल्या चौकशीच्या पार्श्वभूमीवर त्यांनी पदाचा त्याग करण्याचा निर्णय घेतला आहे. ही चौकशी निष्पक्ष आणि पारदर्शक होण्याच्या दृष्टीकोनातून मी त्यांचा…
— Sunetra Ajit Pawar (@SunetraA_Pawar) March 21, 2026
पाच-सहा वर्षांपूर्वी आपण ज्या व्यक्तीच्या संपर्कात असतो, ते पाच-सहा वर्षांनी एखाद्याचे कृत्य, वैयक्तिक वागणूक, वैयक्तिक आयुष्य याबद्दल आपल्याला सुतराम कल्पना नसते. आज जे आपल्यासोबत आहेत, ते उद्या पुढे जाऊन कसं वागतील, ही कल्पना आपल्या कोणाला नसते. त्यामुळे मी ही घटना समजल्यावर मला धक्का बसला,” असे रूपाली चाकणकर यांनी सांगितले.
“मी लगेच ट्विटही केलं. या देवस्थान ट्रस्टशी माझ्या कुटुंबाचा संबंध आहे. शिवनिका संस्थानमध्ये मी प्रदेशाध्यक्ष होते, तेव्हापासून सदस्य म्हणून ट्रस्टवर काम केले आहे. माझ्यासमवेत समाजातील अनेक प्रतिष्ठित नागरिक, मान्यवर या ट्रस्टवर होते. मी ट्रस्टची सदस्य होते, त्यानंतर मी महिला आयोगाची अध्यक्ष झाले. या ट्रस्टचा कार्यकाळ 8 ऑगस्ट 2025 रोजी संपुष्टात आला होता,” असे राजीनामा दिल्यानंतर माध्यमांसोबत बोलताना रुपाली चाकणकर यांनी स्पष्ट केले.
हेही वाचा:
Donald Trump : इराणसोबतचे युद्ध थांबणार? लष्करी मोहिमा थांबवण्याचे संकेत देत ट्रम्प यांनी ठेवली अट






