विदर्भात शाळांना 30 जूनपर्यंत उन्हाळ्याची सुट्टी – दीपक केसरकर
Updated On:

मुंबई – उन्हाळ्याच्या सुट्टीनंतर राज्यातील शाळा या 15 जूनपासून सुरू करण्यात येतात. त्याचप्रमाणे यंदाही राज्यातील शाळा या 15 जूनला सुरू करण्यात येणार आहेत. पण यामधून विदर्भातील शाळांना वगळण्यात आले आहे.
विदर्भातील सर्व शाळांना 29 जूनपर्यंत उन्हाळ्याची सुट्टी देण्यात आली आहे. त्यामुळे 30 जूनला विदर्भातील शाळा सुरू करण्यात येणार आहेत. याबाबतची माहिती शालेय शिक्षणमंत्री दीपक केसरकर यांच्याकडून देण्यात आलेली आहे.
विदर्भात यावर्षी उन्हाची तीव्रता जास्त असल्याने आणि मुलांना आपल्या सुट्ट्यांचा नीट आनंद घेता यावा, यासाठी हा निर्णय घेण्यात आल्याचे दीपक केसरकर यांच्याकडून सांगण्यात आले आहे. तसेच यंदा केंद्राचा नवभारत साक्षरता कार्यक्रम घेतला जाणार असल्याचे सांगण्यात आले आहे.





