ATP Perugia Challenger 2024 | सुमित नागलची चमकदार कामगिरी कायम, पेरुगिया चॅलेंजरच्या उपांत्य फेरीत केला प्रवेश….

ATP Perugia Challenger 2024 (Sumit Nagal) | भारतीय टेनिसपटू सुमित नागलने आपला उत्कृष्ट फॉर्म कायम ठेवत शुक्रवारी इटलीतल्या पेरुगिया इथं सुरू असलेल्या एटीपी चॅलेंजर स्पर्धेच्या पुरुष एकेरीत उपांत्य फेरीत प्रवेश केला आहे. काल झालेल्या उपांत्यपूर्व फेरीत सहाव्या मानांकित सुमितनं बिगरमानांकित पोलंडच्या मॅक्स कास्निकोव्स्कीचा 6-4, 7-5 असा सरळ सेटमध्ये पराभव केला.
Just in: Sumit Nagal sails into SEMIS of Perugia Challenger (Clay) in Italy.
Sumit beat lower ranked Polish player Maks Kasnikowski 6-4, 7-5. pic.twitter.com/vYaW74TrPk
— India_AllSports (@India_AllSports) June 14, 2024
सहाव्या मानांकित सुमित नागलनं उत्कृष्ठ खेळी करत 10 दिवसांत सलग आठवा सामना जिंकला आहे . आज रात्री 7.30 वाजता उपांत्य फेरीत त्याची लढत स्पेनच्या बर्नाबे जपाता मिरालेसशी होणार आहे.
नागलने याआधी प्राथमिक फेरीत बोस्निया-हर्जेगोव्हिनाच्या बिगरमानांकित नॉर्मन फॅटिकवर विजय मिळवला होता आणि त्यानंतर उपउपांत्यपूर्व फेरीत इटलीच्या बिगरमानांकित ॲलेसँड्रो गियानेसीवर मात केली होती.
3-star Grand Prix Event 2024 | घोडेस्वार श्रुती व्होराची ऐतिहासिक विजयाची नोंद…
दरम्यान, नागलने हेलब्रॉन चॅलेंजर विजेतेपद पटकावले होते, जी या मोसमात त्याची दुसरी चॅलेंजर ट्रॉफी होती. त्याने फेब्रुवारीमध्ये चेन्नई चॅलेंजर ट्रॉफी जिंकली होती. फ्रेंच ओपन आणि हेल्ब्रॉन चॅलेंजरमधल्या सुरेख कामगिरीनंतर नागलनं जागतिक क्रमवारीत 77व्या स्थानावर झेप घेतली आहे. त्याच्या एकेरीच्या क्रमवारीच्या आधारे तो पॅरिस ऑलिम्पिकसाठी पात्र ठरला आहे.





