Antonio Tajani : आपला वैयक्तिक डाटा डार्कवेबवर प्रकाशित; इटलीच्या परराष्ट्र मंत्र्यांचा दावा
सायबर गुन्हेगारांकडून आपला वैयक्तिक डाटा डार्कवेबवर प्रसिद्ध करण्यात आल्याचा दावा इटलीचे परराष्ट्र मंत्री अँटोनिओ ताजानी (Antonio Tajani) यांनी केला आहे.

Antonio Tajani : सायबर गुन्हेगारांकडून आपला वैयक्तिक डाटा डार्कवेबवर प्रसिद्ध करण्यात आल्याचा दावा इटलीचे परराष्ट्र मंत्री अँटोनिओ ताजानी (Antonio Tajani) यांनी केला आहे. आपल्या वैयक्तिक डाटाचा काही महत्वाचा भाग उघड करण्यात आला असून आपल्याला धोका आणि धमक्या येऊ शकतात, असे ताजानी यांनी सोशल मीडियावरच्या पोस्टमध्ये म्हटले आहे.
अलिकडच्या काळात युरोपातल्या अनेक विमानांना बॉम्ब हल्ल्यांच्या धमक्या मिळाल्या होत्या. अशा हल्ल्यांच्या अफवा देखील पसरल्या होत्या. त्यामुळे अनेक विमानांचे मार्ग बदलण्यात आले होते. विमानतळांवरील सुरक्षा (Antonio Tajani) वाढवण्यात आली होती.
अनेक वृत्तवाहिन्यांनाही धमक्या मिळाल्या होत्या. तसेच अनेक देशांमधील मध्यवर्ती शीतकरण प्रणाली बंद पडली होती. काही देशांच्या हवाई हद्दीमध्ये ड्रोनची घुसखोरीही झाली होती. या सर्व घटनांच्या पार्श्वभुमीवर ताजानी यांनी वैयक्तिक डाटा डार्कवेबवर उघड करण्यात आल्याचा दावा केला आहे.
अनेक दिवसांपासून सायबर गुन्हेगार आपला वैयक्तिक डाटा डार्कवेबवर पसरवत आहेत आणि अन्य माहितीही मागवत आहेत. प्रत्यक्षात मला आणि कुटुंबीयांना नवीन धोके आणि धमक्या दिल्या जाण्याची व्यवस्था करत आहेत, असे ताजानी यांनी म्हटले आहे. ताजानी हे इटलीचे उपपंतप्रधान देखील आहेत. नक्की कोणत्या स्वरुपाची माहिती डार्कवेबवर टाकली गेली, हे त्यांनी स्पष्ट केले नाही.
आपण कोणत्याही धमकावण्याला घाबरत नाही, आपल्या मंत्रालयाच्या आणि इटलीच्या सुरक्षेसाठी आपण काम करतच राहणार आणि सर्वांची सुरक्षा अधिक बळकट करण्यासाठी प्रयत्न करतच राहणार असल्याचेही त्यांनी (Antonio Tajani) म्हटले आहे. या सायबर हल्ल्यामागे कोण आहे, हे त्यांनी सांगितले नाही. मात्र इटली सरकारकडून युक्रेनला यापुढेही पाठिंबा असेल, याचा पुनरुच्चारही त्यांनी केला.





