WR Chess Masters Title 2024 : भारतीय ग्रँडमास्टर अर्जुन एरीगॅसीनं (Arjun Erigaise) डब्ल्यूआर चेस मास्टर्सच्या अंतिम फेरीत फ्रान्सच्या मॅक्सिम व्हॅचियर-लॅग्रेव्हचा (Maxime Vachier-Lagrave) पराभव करून विजेतेपद पटकावले.
एरीगॅसीने क्लासिक बुद्धिबळातील (Classical chess) दोन सामने अनिर्णित राहिल्यानंतर ‘आर्मगेडॉन गेम’मध्ये (Armageddon game) फ्रेंच खेळाडूला पिछाडीवर टाकले. एरीगॅसीने संपूर्ण स्पर्धेत लय कायम राखत चमकदार खेळ केला. या विजेतेपदानंतर त्याने बक्षीस म्हणून 20000 युरो (सुमारे 18.23 लाख रुपये) जिंकले. या बाद फेरीच्या उपांत्य फेरीत त्याने देशबांधव आर प्रज्ञानंदचा (R Praggnanandhaa) पराभव करत आगेकूच केली होती.
Congratulations to World #3, 🇮🇳 Arjun Erigaisi, for winning the @wr_chess Masters Cup! 🏆 👏
♟️ Arjun secured tournament victory by defeating former World Blitz Champion Maxime Vachier-Lagrave 🇫🇷, one of the few players to have surpassed the 2800 rating mark, in the final. In… pic.twitter.com/myxw25rPDM
— International Chess Federation (@FIDE_chess) October 18, 2024
सोळा खेळाडूंच्या स्पर्धेतील सलामीच्या लढतीत एरीगॅसीने इंग्लंडची नऊ वर्षीय खेळाडू शिवानंद बोधना (Sivananda Bodhana) हिचा पराभव केला. शिवानंद नुकतीच बुद्धिबळ ऑलिम्पियाडमध्ये भाग घेणारी सर्वात तरुण खेळाडू ठरली होती. त्यानंतर एरिगेसीने पुढील दोन फेऱ्यांमध्ये विदित गुजराती (Vidit Gujrathi) आणि प्रज्ञानंद यांचा अनुक्रमे 1.5-0.5 अशा एक समान फरकाने पराभव केला.
Six Kings Slam 2024 : उपांत्य फेरीत अल्काराझकडून नदालला पराभव धक्का…
व्हॅचियर-लॅग्रेव्हने अंतिम फेरीत जागतिक क्रमवारीत चौथ्या क्रमांकावर असलेल्या अर्जुन एरीगॅसीला कडवी झुंज दिली परंतु ‘आर्मगेडॉन गेम’मध्ये तो कमी पडला. या विजयासह, अर्जुन एरीगॅसी 2800 ईएलओ रेटिंग (ELO rating mark) प्राप्त करण्याच्या जवळ पोहचला आहे.