सुखबीर सिंग बादल यांच्यावर प्राणघातक हल्ला ; सुवर्ण मंदिराच्या प्रवेश द्वारावर गोळीबार, थोडक्यात वाचले

Sukhbir Singh Badal Attack । पंजाबमध्ये शिरोमणी अकाली दल (एसएडी) नेते सुखबीर सिंह बादल यांच्यावर गोळीबार झाल्याची बातमी आहे. या हल्ल्यातून ते थोडक्यात बचावले आहेत. सुवर्ण मंदिराच्या प्रवेशद्वाराजवळ एका व्यक्तीने त्यांच्यावर गोळीबार केल्याचे सांगण्यात येत आहे. या घटनेचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे.
पंजाबच्या अमृतसरमधील सुवर्ण मंदिर परिसरात गोळ्या झाडण्यात आल्या, ज्याठिकाणी पक्ष प्रमुख सुखबीर सिंग बादल यांच्यासह शिरोमणी अकाली दलाचे नेते 2 डिसेंबर रोजी श्री अकाल तख्त साहिबने घोषित केलेल्या धार्मिक तपस्याचा भाग म्हणून ‘सेवा’ करत होते. या गोळीबारात सुखबीर सिंग बादल थोडक्यात बचावले. नारायण सिंह चौडा असे गोळ्या झाडणाऱ्या व्यक्तीचे नाव आहे. त्याने सुखबीर सिंह बादल यांना गोळ्या घालण्याचा प्रयत्न केला होता. मात्र सुरक्षा कर्मचाऱ्यांनी सतर्कता दाखवत नारायण चौडा यांना नियंत्रित केले.
#WATCH | Punjab: Bullets fired at Golden Temple premises in Amritsar where SAD leaders, including party chief Sukhbir Singh Badal, are offering ‘seva’ under the religious punishments pronounced for them by Sri Akal Takht Sahib, on 2nd December.
Details awaited. pic.twitter.com/CFQaoiqLkx
— ANI (@ANI) December 4, 2024
या घटनेबाबत एडीसीपी हरपाल सिंह म्हणाले की, याठिकाणी कडक सुरक्षा व्यवस्था ठेवण्यात आली होती. सुखबीर सिंग बादल यांना अगोदरच सुरक्षा देण्यात आली होती. सकाळी सात वाजता ते याठिकाणी आले. नारायण सिंह चौडा (हल्लेखोर) हे कालही याठिकाणी होते, याआधी ते या गुरुघरात दर्शनासाठी गेले होते. यानंतर ते बाहेर आले आणि त्यांनी गोळीबार केला मात्र त्याठिकाणी आमचे सैनिक उपस्थित असल्याने त्यांच्यावर थेट गोळीबार करता आला नाही. कुणालाही गोळी लागली नाही.
सुखबीर बादल यांना काय शिक्षा झाली? Sukhbir Singh Badal Attack ।
शीख समुदायाच्या ‘सर्वोच्च न्यायालयाने’ म्हणजेच श्री अकाल तख्त साहिबने सुखबीर बादल यांना धार्मिक शिक्षा सुनावली आहे. तो गुरुद्वारामध्ये सेवा करणार आहे. भांडी धुणार आणि पहाराही ठेवणार आहेत. श्री दरबार साहिबमध्ये बांधलेल्या सार्वजनिक शौचालयांचीही स्वच्छता करणार आहे. 2007 ते 2017 या काळात अकाली दल सरकारच्या काळात झालेल्या धार्मिक चुकांसाठी जथेदार श्री अकाल तख्त यांनी बादल आणि त्यांच्या पक्षाच्या नेत्यांना शिक्षा सुनावली आहे. त्याच शिक्षेची भरपाई अकाली नेते सेवा देऊन करत आहेत.
काय आहे आरोप? Sukhbir Singh Badal Attack ।
अकाल तख्तने सुखबीर बादल आणि त्यांच्या मंत्रिमंडळाविरुद्ध दोषी ठरवले आहे. बादलने डेरा सच्चा सौदा प्रमुख राम रहीमला ईशनिंदा प्रकरणात माफी मिळण्यास मदत केल्याचा आरोप आहे. यासाठी बादल यांनी आपल्या अधिकारांचा वापर करून राम रहीमविरोधातील तक्रार मागे घेतली आहे. श्री गुरू ग्रंथ साहिबच्या अपमानप्रकरणी कोणतीही कारवाई झाली नाही आणि संगतांच्या पैशातून राजकीय जाहिराती केल्या गेल्या. डीजीपी सुमेध सैनी यांची नियुक्ती हा धार्मिक गुन्हा असल्याचे म्हटले आहे.





