satara | सुखात्मे स्कूलचा सलग अकराव्या वर्षी शंभर टक्के निकाल

लिंब, (वार्ताहर) – केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळ ( सी.बी.एस.ई) बोर्ड नवी दिल्ली यांच्यामार्फत शैक्षणिक वर्ष सन 2023- 24 मध्ये घेण्यात आलेल्या एस.एस.सी बोर्डाच्या परीक्षेत येथील गौरीशंकरच्या डॉ. पी. व्ही सुखात्मे स्कूलच्या विद्यार्थ्यांनी घवघवीत यश संपादित करत सलग 11 वे वर्ष शंभर टक्के निकालाची परंपरा कायम ठेवली.
यामध्ये अथर्व देवीदास बागल याने 96.40 टक्के मिळवून विशेष चमकदार कामगिरी करत गणित व मराठी विषयात 100 पैकी 100 गुण प्राप्त मिळवले तर वैष्णवी विजय पाटील हिने 95 टक्के, वेदांगी प्रवीण पाटील हिने 88 टक्के, सुमित सुरेंद्र कुशवाह याने 87.40 टक्के गुण मिळवून स्कूलचा नावलौकिक उंचावला आहे. तसेच सानवी नितीन पवार, प्राजक्ता सुखदेव मदने, विश्वराज जयवंतराव जाधव , गायत्री सचिन मोरे, ईश्वरी प्रशांत नागटिळक यांनीही गुणवत्तेत उल्लेखनीय कामगिरी केली.
यशस्वी विद्यार्थ्यांचा सत्कार संस्थेचे प्रशासकीय अधिकारी नितीन मुडलगीकर यांच्या हस्ते करण्यात आला. यावेळी संस्थेचे जनसंपर्क अधिकारी श्रीरंग काटेकर, प्राचार्या डॉ. नवनिता पटेल, घनश्याम चव्हाण, प्रा. अमित मडके, प्रा. शिल्पा भोसले, नितीन शिवथरे, राकेश खोपडे उपस्थित होते. यशस्वी विद्यार्थ्यांचे संस्थेचे अध्यक्ष मदनराव जगताप, उपाध्यक्ष मिलिंद जगताप, संचालक डॉ. अनिरुद्ध जगताप, रती. जगताप यांनी अभिनंदन केले.





