सुजय विखे, संदीपान भुमरे आणि वसंत मोरे, स्वत:लाच मत देऊ शकत नाहीत; वाचा नेमकं कारण….

Sujay Vikhe Patil | Sandipan Bhumre | Vasant More | लोकसभा निवडणुकीच्या चौथ्या टप्प्यातील मतदानाला सकाळी सात वाजल्यापासून सुरुवात झाली आहे. राज्यातील ११ मतदार संघात मतदान पार पडत आहे. यात नंदूरबार, जळगाव, रावेर, जालना, छत्रपती संभाजीनगर, मावळ, पुणे, शिरुर, नगर, शिर्डी आणि बीड या मतदारसंघाचा समावेश आहे.
पुण्यातून मुरलीधर मोहोळ, रवींद्र धंगेकर आणि वंचितकडून वसंत मोरे यांना उमेदवारी देण्यात आली आहे. तिन्ही तगडे नेते मानले जात आहे. त्यामुळे निवडणूक अटीतटीची होणार आहे. तर दुसरीकडे अहमदनगरमधून सुजय विखे-पाटील, छत्रपती संभाजीनगरमधून संदीपान भुमरे हे निवडणुकीच्या मैदानात उतरले आहेत.
या निवडणुकात कोट्यवधी मतदार आपला मतदानाचा हक्क बजावत आहे. परंतु सुजय विखे-पाटील, संदीपान भुमरे आणि वसंत मोरेंना या तीन उमेदवारांना मतदान करता आले नाही. कारण तिथल्या मतदारयादीत त्यांची नोंद नसल्यानं त्यांच्यावर ही वेळ आली आहे.
ज्या मतदारसंघातून ते निवडणूक लढवत आहेत, तिथल्या मतदार यादीत त्यांची नोंद नसल्यानं त्यांच्यावर ही वेळ आलीय. यामध्ये छत्रपती संभाजीनगरमधले महायुतीचे उमेदवार संदीपान भुमरे, अहमदनगरचे महायुतीचे उमेदवार सुजय विखे आणि पुण्याचे वंचित बहुजन आघाडीचे उमेदवार वसंत मोरे यांचा समावेश आहे.
संदीपान भुमरेंचं मतदान जालना मतदारसंघातल्या पैठणमध्ये आहे, सुजय विखेंचं नाव शिर्डी मतदारसंघातल्या लोणीमधल्या मतदारयादीमध्ये आहे तर वसंत मोरे यांचं नाव कात्रजमधल्या मतदारयादीत असून हा भाग शिरुर मतदारसंघाला जोडलेला आहे. त्यामुळे हे उमदेवार मतदानापासून दूर राहिले आहेत.
महाराष्ट्रात दुपारी 3 वाजेपर्यंत 42.35 टक्के मतदान
नंदुरबार – 49.91
जळगाव- 42.15
रावेर – 45.26
जालना – 47.51
संभाजी नगर – 43.76
मावळ -36.54
पुणे – 35.61
शिरूर- 36.43
नगर- 41.35
शिर्डी -44.87
बीड – 46.49





