Suicide: सहाय्यक पोलीस उपनिरीक्षकाची आत्महत्या
Updated On:

नागपूर – सहाय्यक पोलीस उपनिरीक्षकाने आत्महत्या केल्याची घटना नागपूर शहरात घडली. शशिकुमार शेंडे असे आत्महत्या केलेल्या पोलिस अधिकाऱ्याचे नाव आहे. त्यांनी पोलीस मुख्यालयातील सभागृहात गळफास लावून आत्महत्या केली.
शेंडे यांच्या आत्महत्येचे कारण अस्पष्ट असून पोलिसांनी आकस्मिक मृत्यूची नोंद केली आहे. आत्महत्येचे कारण शोधण्यासाठी पोलिसांचा तपास सुरू आहे. शशिकुमार शेंडे गेल्या तीन वर्षांपासून पोलीस मुख्यालयात कार्यरत होते. तसेच त्यांच्या पत्नीही पोलीस विभागात नोकरी करत आहे.





