पुण्यात दहावीत शिकणाऱ्या मुलीची आत्महत्या
Updated On:

पुणे : दोन दिवसांवर आलेली दहावीची परीक्षा आणि अभ्यासाचा ताण यामुळे एका दहावीच्या वर्गात शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थिनीने आत्महत्या केल्याची घटना मोहम्मद वाडी परिसरात घडली. रेहा प्रशांत वर्गीस असे आत्महत्या केलेल्या मुलीचे नाव आहे.
ही घटना शुक्रवारी (दि. ८) सकाळी सात ते रात्री नऊच्या सुमारास घडली. रेहा वर्गीस हीने राहत्या घरी सिलिंग फॅनला ओढणीच्या साह्याने गळफास घेऊन आत्महत्या केली. याप्रकरणाची माहिती डॉक्टर उमा कुलकर्णी यांनी पोलिसांना दिली. याप्रकरणी अकस्मात मृत्यूची नोंद पोलिस ठाण्यात ठाण्यात करण्यात आली आहे.





