गंगूबाई काठियावाडी चित्रपटाचे नाव बदलण्याची सूचना

नवी दिल्ली – चित्रपट रिलीज होण्याआधीच हा वादाच्या भोवऱ्यात सापडला आहे. ह्या चित्रपटातील काही भाग आणि नाव यांच्यावर आक्षेप घेण्यात आला आहे. उद्या गंगूबाई काठियावाडी हा चित्रपट प्रसिद्ध होणार आहे. मात्र, या चित्रपटाचे नाव बदलावे, अशी सूचना सर्वोच्च न्यायालयाने केली आहे. या चित्रपटाचे दिग्दर्शन संजय लीला भन्साळी यांनी केले आहे.
‘GANGUBAI KATHIAWADI’: AJAY DEVGN AS RAHIM LALA… #RahimLala – the character portrayed by #AjayDevgn – in #GangubaiKathiawadi… Stars #AliaBhatt in title role… Directed by #SanjayLeelaBhansali… 25 Feb 2022 release. #PENStudios. pic.twitter.com/G1L1k7cFhm
— taran adarsh (@taran_adarsh) February 19, 2022
हा चित्रपट प्रसिद्ध होऊ देऊ नये, अशी मागणी करणाऱया अनेक याचिका अनेक न्यायालयांमध्ये सादर करण्यात आल्या आहेत. त्या पार्श्वभूमीवर सर्वोच्च न्यायालयाने ही सूचना केल्याचे समजते. यासंबंधीची सुनावणी आज गुरुवारीही सुरु राहणार आहे.
या चित्रपटातील कामाठीपुरा, चायना आणि काठियावाडी हे शब्द गाळण्यात यावेत अशी मागणी करणारी याचिका मुंबई उच्च न्यायालयात सादर करण्यात आली होती. मात्र, ती फेटाळण्यात आली आहे, असेही समजते.





