पुणे जिल्हा | भीमाशंकर कारखान्याच्या सभेत ऊस उत्पादकांचा सन्मान

मंचर, (प्रतिनिधी) – पारगाव दत्तात्रय नगर तालुका आंबेगाव येथील भीमाशंकर सहकारी साखर कारखान्याच्या वार्षिक सर्वसाधारण सभेत ऊस उत्पादकांना पुरस्कार देऊन सहकारमंत्री दिलीप वळसे पाटील यांच्या हस्ते सन्मानित करण्यात आले.
अशी माहिती भीमाशंकरचे अध्यक्ष बाळासाहेब बेंडे पाटील आणि उपाध्यक्ष प्रदीप वळसे पाटील यांनी दिली.
वार्षिक सर्वसाधारण सभेत ऊस उत्पादक शेतकर्यांना पुरस्कार वितरण प्रसंगी माजी खासदार शिवाजीराव आढळराव पाटील, माजी आमदार पोपटराव गावडे, शरद बँकेचे अध्यक्ष देवेंद्रशेठ शहा, तालुका राष्ट्रवादीचे अध्यक्ष विष्णुकाका हिंगे, कारखान्याचे कार्यकारी संचालक चंद्रकांत ढगे,सचिव रामनाथ हिंगे आणि कारखान्याचे संचालक, सभासद,शेतकरी उपस्थित होते. हंगाम वाईज जास्तीत जास्त ऊस उत्पादन घेणारे शेतकरी आणि एकाच नावाने घेतलेल्या शेतकऱ्यांना सन्मानित करण्यात आले.
ऊस पीक स्पर्धा नंबर १.हंगामवाईज जास्तीत जास्त ऊस उत्पादन घेणारे शेतकरी प्रथम क्रमांक संजय भिसे येडगाव, व्दितीय क्रमांक वैभव चव्हाण पारगाव मंगरूळ, तृतीय क्रमांक महेश भालेराव कळंब, प्रथम क्रमांक सुमन बाणखेले सुलतानपूर, व्दितीय संदीप बोंबे पिंपरखेड, तृतीय क्रमांक शंकर बांगर पिंपळगाव, प्रथम क्रमांक विजयराज निकम नागापूर,
व्दितीय क्रमांक भूषण चिखले नांदूर, तृतीय क्रमांक बाळू शेळके वळती, प्रथम क्रमांक प्रशांत लोंढे एकलहरे, व्दितीय क्रमांक अर्चना डोके एकलहरे, तृतीय क्रमांक अविनाश थोरात कळंब. ऊस पिक स्पर्धा नंबर २. कार्यक्षेत्र व परिसरातून एका नावाने जास्तीत जास्त ऊस देणारे शेतकरी पुढील प्रमाणे प्रथम क्रमांक सुभाष वाळुंज जवळे,व्दितीय क्रमांक भानुदास थोरात वाघाळे, तृतीय क्रमांक काशिनाथ कोंडाजी वळसे पाटील निरगुडसर.
ऊस पीक स्पर्धा नंबर ३.कार्यक्षेत्रातील एका गावातून पंधरा हजार मेट्रीक टनांपेक्षा जास्त एकूण उसापैकी ९० टक्क्यांपेक्षा जास्त दिलेली गावे संबंधित ग्रामपंचायत प्रथम क्रमांक खडकी. ऊस पीक स्पर्धा नंबर ४. जास्तीत जास्त ऊस गाळपास दिलेली गावे संबंधित ग्रामपंचायती पुढील प्रमाणे अ,आंबेगाव तालुका प्रथम क्रमांक शिंगवे,व्दितीय क्रमांक निरगुडसर,
तृतीय क्रमांक काठापूर बुद्रुक ,ब शिरूर तालुका प्रथम क्रमांक भीमाशेत,व्दितीय क्रमांक पिंपरखेड, तृतीय क्रमांक कवठे, क जुन्नर तालुका प्रथम क्रमांक पारगाव मंगरूळ,व्दितीय क्रमांक खोडद तृतीय क्रमांक नारायणगाव ऊस पीक स्पर्धा नंबर ५ हंगाम वाईज ऊस पीक स्पर्धेतील बक्षीस पात्र शेतकरी वगळता एकेरी शंभर मेट्रीक टनाचे पुढे ऊस उत्पादन घेणारे शेतकरी पुढील प्रमाणे प्रवीण भिसे येडगाव,
इंदू बोंबे पिंपरखेड, शरद भोसले गणेगाव, विक्रम भिसे येडगाव, प्रमिला चव्हाण पारगाव मंगरूळ, मंगल पवार काठापुर खुर्द, संदीप वरे पिंपरखेड, नवनाथ काळे घोडेगाव, मनोहर शेळके वळती.





