साखर घोटाळा : वैद्यनाथ बँकेच्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यास अटक
Updated On:

बीड – भाजप नेत्या पंकजा मुंडे यांच्या ताब्यात असलेल्या वैद्यनाथ अर्बन बँकेचे सहाय्यक मुख्य कार्यकारी अधिकारी नितीन चितळे यांना साखर घोटाळ्याप्रकरणी पोलिसांनी अटक केली आहे. उस्मानाबाद आर्थिक गुन्हे शाखेच्या पथकाने अटक केली असून शंभू महादेव साखर कारखान्याच्या 46 कोटी रुपयांच्या साखर घोटाळ्याप्रकरणी ही कारवाई करण्यात आली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, उस्मानाबादच्या हावरगाव मधील शंभू महादेव साखर कारखान्याने परळीमधील वैद्यनाथ बँकेकडे तारण म्हणून 46 कोटी रुपयाची साखर ठेवली होती. याप्रकरणी कळंब पोलीस स्टेशन मध्ये शंभू महादेव साखर कारखान्याच्या चेअरमन दिलीप यांच्यासह 40 जणांविरुद्ध फसवणुकीचा गुन्हा नोंद करण्यात आला होता. याप्रकरणी यापूर्वी एकास पोलिसांनी ताब्यात घेतले होते. आता ही दुसरी अटकेची कारवाई करण्यात आली आहे.





