सुगंधा मिश्राने फ्लॉन्ट केला बेबी बंप; पतीसोबत दिसली रोमॅंटिक अंदाजात

मुंबई – द कपिल शर्मा (The Kapil Sharma) शोमधील कॉमेडियन अभिनेत्री सुगंधा मिश्राच्या घरी (Sugandha Mishra) एका चिमुकल्या पाहुण्याचे आगमन होणार आहे. लवकरच सुगंधा आई होणार असल्याने ती खूप आनंदी आहे. नुकतेच तिने प्रेग्नन्सीदरम्यानचे काही फोटो सोशल मीडियावर शेअर केले आहेत. यात सुंगधा पती संकेत भोसले याच्यासोबतचे दिसत आहे. या फोटोमध्ये दोघेही खूप खुश दिसत आहे.
गायिका आणि कॉमेडियन सुगंधा मिश्रा हिने 15 ऑक्टोबर रोजी तिच्या चाहत्यांसोबत आनंदाची बातमी शेअर केली होती. तेव्हापासून चाहते खूप उत्सुक आहेत. प्रेक्षकांनाही ही जोडी खूप आवडते. हे जोडपंही आपल्या पहिल्या मुलाच्या स्वागतासाठी जोरदार तयारी करत आहे. सोशल मीडियावर शेअर केलेल्या फोटोंमध्ये सुगंधा आणि संकेत एकमेकांसोबत पोज देताना दिसत आहेत. यात ती तिचे बेबी बंप फ्लॉंट करताना दिसत आहे. सुगंधाने शेअर केलेल्या फोटोंमध्ये ती पतीसोबत समुद्र किनाऱ्यावर दिसत आहे.
View this post on Instagram
या फोटोंमध्ये दोघेही खूप सुंदर दिसत आहे. त्यांचा या फोटोवर चाहत्यांच्या प्रेमाचा वर्षाव होताना दिसत आहे. दरम्यान, सुगंधा मिश्राने 26 एप्रिल 2021 मध्ये संकेतसोबत लग्न केले. सुगंधाने स्टँडअप कॉमेडियन म्हणून तिची एक वेगळी जागा निर्माण केली आहे. ती द कपिल शर्मा शो मध्ये देखील झळकली आहे. यातील तिच्या अभिनयाचे देखील खूप कौतुक केले जाते.





