Sudhir Salvi : ‘…म्हणून सुधीर साळवींना पक्षाचं सचिवपद दिलं; उद्धव ठाकरेंनी केलं स्पष्ट

मुंबई : एकीकडे नेते आणि पदाधिकारी पक्षाला सोडून जाताना दिसत आहेत तर दुसरीकडे उद्धव ठाकरेंनी आपल्या पक्षात काही बदल केले आहेत. उद्धव ठाकरेंनी काल सुधीर साळवींची (Sudhir Salvi) पक्षाच्या सचिवपदी नियुक्ती केली आहे. त्यांनी सुधीर साळवींची (Sudhir Salvi) पक्षाच्या सचिवपदी का नियुक्ती केली? याचे करूनदेखील उद्धव ठाकरेंनी सांगितले आहे.
काय म्हणाले उद्धव ठाकरे?
आपल लक्ष मुंबई महानगर पालिका आहे. यासाठी सुधीरला सचिव पद दिलंय अस उद्धव ठाकरे यांनी लालबाग-परळ येथील शिवसैनिकांना सांगितलं. सुधीर साळवी यांची शिवसेना सचिव पदी नियुक्ती झाल्यानंतर लालबाग परळ येथील शिवसैनिक मातोश्रीवर आले होते. लालबाग परळ म्हणजे कट्टर शिवसैनिक असल्याचे यावेळी उद्धव ठाकरे म्हणाले.
हे पण वाचा : Maharashtra Politics : आणखी एक धक्का ! ‘या’ दांपत्याचा ठाकरेंना ‘जय महाराष्ट्र’
ठाकरेंनी आश्वासन पाळलं
काही महिन्यांपूर्वी पार पडलेल्या विधानसभा निवडणुकीआधी उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेकडून आमदारकीची सीट सुधीर साळवींना दिली जाईल अशी शक्यता असताना अजय चौधरी यांना पुन्हा संधी देण्यात आली. यानंतर दक्षिण मुंबईतल्या शिवसैनिकांमध्ये प्रचंड नाराजी पाहायला मिळाली होती.तेव्हा सुधीर साळवींचा योग्य सन्मान राखला जाईल, असे आश्वासन उद्धव ठाकरेंनी दिले होते. यानंतर उद्धव ठाकरेंनी सुधीर साळवींना (Sudhir Salvi) पक्षाचं सचिवपद देऊन आपले आश्वासन पाळले आहे. यामुळे दक्षिण मुंबईतील शिवसैनिकांमध्ये आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे.



