Satara : सपोनि सुधीर पाटील यांची मेढा येथे नियुक्ती
Updated On:

कुडाळ : मेढा पोलीस ठाण्याच्या सहाय्यक पोलीस निरीक्षकपदी सुधीर पाटील यांची नियुक्ती करण्यात आली असून, त्यांनी मंगळवारी (दि. 21) पदभार स्वीकारला.
पोलिसांची जनसामान्यातील प्रतिमा उंचावण्यास प्राधान्य देणार आहे. कायद्याचा अनादर करणार्या कोणाचीही गय केली जाणार नाही, अशी ग्वाही त्यांनी दिली. एकीव, ता. जावळी जवळच्या हॉटेल जयमल्हारमधील वादग्रस्त नाइट पार्टीमुळे तत्कालीन सपोनि पृथ्वीराज ताटे हे वादात अडकले होते.
त्यामुळे गेले काही दिवस मेढ्याचा पदभार सपोनि अश्विनी पाटील यांच्याकडे होता. स्थानिक गुन्हे शाखचे सपोनि सुधीर पाटील यांची पोलीस अधीक्षक समीर शेख यांनी मेढा येथे नियुक्ती केली आहे.





