Sudhanshu Trivedi : पायलट स्मितबाबत काॅंग्रेसचे मौन का? भाजपचे प्रवक्ते सुधांशू त्रिवेदी यांची टीका
त्रिवेदी (Sudhanshu Trivedi) म्हणाले की, महात्मा गांधींच्या जयंतीदिनी करण्यात आलेल्या या नियुक्त्यांवरून महात्मा गांधी आणि काँग्रेसमधील गांधी कुटुंब यांच्यातील मोठी दरी दिसून येते.

Sudhanshu Trivedi : दुबई-तेल अवीव विमान कोसळवण्याचा सह-पायलटचा कथित प्रयत्न हाणून पाडणाऱ्या भारतीय पायलट स्मित मच्छार यांच्याबाबत काॅंग्रेस पक्षाचे मौन नकारात्मक विचारसरणीचे प्रतीक आहे.
एवढे मोठे साहस करुनही स्मितच्या प्रती भावना व्यक्त करणेही या नेत्यांना जमलेले नाही. अगदी अशीच स्थिती त्या पक्षाची झाली आहे की, त्यांनी उत्तर प्रदेशातही चुकीच्या नियुक्त्या केल्या आहेत, अशी टीका भाजपचे प्रवक्ते सुधांशू त्रिवेदी (Sudhanshu Trivedi) यांनी केली आहे.
बुधवारी दुबईहून तेल अवीवकडे जाणाऱ्या फ्लायदुबईच्या एफझेड1073 या विमानातील कॉकपिटमध्ये, ओमानच्या सह-वैमानिकाने ज्या मच्छार यांच्यावर चाकूने वार केले होते, त्या घटनेबाबत काँग्रेस (Sudhanshu Trivedi) नेते गप्प आहेत. जीवघेणी गंभीर दुखापत होऊनही, १७४ प्रवाशांना घेऊन जाणाऱ्या या विमानाला पाडण्याचा कथित प्रयत्न मच्छार यांनी हाणून पाडला.
वैमानिकाच्या या कृतीचे जाहीरपणे कौतुक न केल्यामुळे गांधी कुटुंबीयांनी दहशतवादाला मूक पाठिंबा दर्शवल आहे, हे सिद्ध होते. काँग्रेस नेते सोनिया गांधी, प्रियांका गांधी-वाड्रा आणि राहुल गांधी यांनी मच्छार यांच्या समर्थनार्थ काहीही का म्हटले नाही. तसेच पक्षाचे नेतृत्व आपली व्होट बँक गमावण्याच्या भीतीने सावध पवित्रा घेत असल्याचा आरोपही त्रिवेदी यांनी केला.
उत्तर प्रदेशातील नियुक्त्या
उत्तर प्रदेशातील नियुक्त्यांवरून भाजपने काँग्रेसवर टीका केली. आराधना मिश्रा यांची उत्तर प्रदेश काँग्रेसच्या अध्यक्षपदी आणि इम्रान मसूद यांची कार्याध्यक्षपदी नियुक्ती केल्याबद्दल त्रिवेदी यांनी काँग्रेसवर कडक शब्दांत टीका केली. त्रिवेदी (Sudhanshu Trivedi) म्हणाले की, महात्मा गांधींच्या जयंतीदिनी करण्यात आलेल्या या नियुक्त्यांवरून महात्मा गांधी आणि काँग्रेसमधील गांधी कुटुंब यांच्यातील मोठी दरी दिसून येते.
मसूद हे मोदींचे तुकडे-तुकडे करण्याची धमकी देणाऱ्या त्यांच्या जुन्या विधानासाठी ओळखले जातात. तसेच, मिश्रा यांनी एकदा पक्ष कार्यकर्त्यांना भारत माता की जय अशी घोषणा देण्यापासून रोखले होते आणि त्याऐवजी “काँग्रेस जिंदाबाद” अशी घोषणा देण्यास सांगितले होते, असा आरोपही त्यांनी केला.






