“इतका सुंदर क्षण माझ्या आयुष्यात आला…”; पूजा सावंतने सांगितला अभिनेत्री तब्बू सोबतच्या भेटीचा अनुभव

Pooja Sawant | अभिनेत्री पूजा सावंतने मराठीसह हिंदी प्रोजेक्ट्समध्ये देखील काम केले आहे. आपल्या अभिनय कौशल्याने तिने स्वत:ची एक वेगळी ओळख निर्माण केली आहे. नुकतेच तिने सोशल मिडियावर एक पोस्ट शेअर केले आहेत. एका कार्यक्रमादरम्यान पूजा प्रसिद्ध बॉलीवूड अभिनेत्री तब्बूला भेटली. यादरम्यानचा खास अनुभव पूजाने तब्बूच्या वाढदिवसानिमित्त सोशल मीडियावर शेअर केला आहे.
इनस्टाग्रामवर शेअर केलेल्या या पोस्टमध्ये पूजाने अभिनेत्री तब्बूला पहिल्यांदाच भेटण्याचा अनुभव कसा होता ? याबाबत सांगितले आहे. “या सुंदर स्त्रीला वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा! आपल्या ज्या गप्पा झाल्या, त्या खरंच न विसरता येणाऱ्या होत्या. आपल्या भेटीचा हा इतका सुंदर क्षण माझ्या आयुष्यात आला हे मी कधीही विसरू शकणार नाही. तळटीप – आम्ही ज्याप्रकारे या फोटोमध्ये पोझ दिल्या आहेत. ही संपूर्ण तब्बू यांची संकल्पना होती. मी तिला फक्त सेल्फीसाठी विचारलं होतं आणि त्यानंतर आम्ही असं फोटोशूट काढले. ती SweetHeart आहे”, अशी पोस्ट पूजाने शेअर केली आहे. Pooja Sawant |
View this post on Instagram
विशेष म्हणजे तब्बू आणि पूजा या दोघींनी फोटोमध्ये सुंदर साडी नेसली आहे. पूजाने गोल्डन रंगाची तर तब्बूने ऑफ व्हाइट रंगाची साडी नेसलीये. या दोघीही या लूकमध्ये खूपच सुंदर दिसत आहेत. या पोस्टवर चाहत्यांनीही कौतुकाचा वर्षाव केला आहे. Pooja Sawant |
हेही वाचा :
पाबळ गटात युद्ध पूर्व शांतता; अनपेक्षित उमेदवारामुळे दिग्गज उमेदवारांमध्ये संभ्रम





