मिशन दिव्यास्त्र अग्नि ५ ची यशस्वी चाचणी; PM मोदींनी केले अभिनंदन

नवी दिल्ली – पंतप्रधान नरेंद्र मोदी आज म्हणजे सोमवारी सायंकाळी काहीतरी मोठी घोषणा करतील असे आज सांगण्यात आले होते. ती मोठी घोषणा म्हणजे नक्की काय असेल याबाबत सगळ्यांना उत्सुकता लागली असताना तसे काही नसल्याचेही नंतर समोर आले.
मात्र मोदी यांनी एक ट्वीट करून डीआरडीओच्या शास्त्रज्ञांचे अभिनंदन केले आहे. दिव्यास्त्र मोहीमेच्या यशाबद्दल त्यांनी शास्त्रज्ञांची प्रशंसा केली आहे. दिव्यास्त्र मिशनबद्दल आम्हाला आमच्या शास्त्रज्ञांचा अभिमान आहे.
दिव्यास्त्र ही एमआयआरव्ही प्रणाली अर्थात मल्टीपल इंडिपेंडटली टार्गेटेबल रि एन्ट्री व्हेईकल प्रणाली आहे. या प्रणालीमुळे एक क्षेपणास्त्र एकाच वेळी अनेक अण्वस्त्रे वाहुन नेण्यास सक्षम ठरते. या अण्वस्त्रांनी वेगवेगळ्या लक्ष्यांना भेदले जाऊ शकते.
त्याचे आणखी एक वैशिष्ट्य म्हणजे रस्ता वाहतुकीतून ते अन्यत्र नेले जाउ शकते. एमआयआरव्हीसोबत भारताच्या स्वदेशी बनावटीच्या अग्नि- ५ ची पहिली यशस्वी चाचणी घेण्यात आली. यापूर्वी अग्नि क्षेपणास्त्रांमध्ये ही सुविधा नव्हती.





