Satara | नीट परीक्षेत आंबेवाडीच्या यश शितोळे याचे सुयश
Updated On:

नागठाणे,(प्रतिनिधी) – वैद्यकीय प्रवेशासाठीच्या ‘नीट’ परीक्षेत आंबेवाडी (ता. सातारा) येथील शेतकरी कुटूंबातील यश सुधाकर शितोळे याने ७२० पैकी ६३७ गुणांसह उज्ज्वल यश मिळविले आहे.
त्याला ‘एमबीबीएस’ पदवी शिक्षणासाठी पहिल्याच फेरीत सिंधुदुर्ग येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात प्रवेश मिळाला आहे.
यशचे वडील सुधाकर शितोळे एम. एस्सी अॅग्री असून ते शेती करतात. तर आई गृहिणी आहेत. खा. उदयनराजे भोसले, खा. नितीन पाटील, मनोजदादा घोरपडे ,यशवंतराव ढाणे, बाबासाहेब घोरपडे, भरत देशमुख, नंदकुमार शितोळे व ग्रामस्थांसह पंचक्रोशीतून अनेकांनी यशचे अभिनंदन केले आहे.
यशचे प्राथमिक शिक्षण छ. शिवाजी विद्यालय मिलिटरी अपशिंगे येथे तर बारावीपर्यंतचे शिक्षण संजय घोडावत आयआयटी अतिग्रे येथे झाले. त्याने नीट परिक्षेसाठी अँलन इन्स्टिटयूट बाणेर पुणे येथे मार्गदर्शन घेतले आहे.





