CA Exams: सीए परीक्षेत वेहेरगावच्या लेकींचे यश; वीरा बोत्रे, पायल देशमुखने ठेवला आदर्श
CA Exams: वीरा बोत्रे, पायल देशमुखने ठेवला आदर्श

कार्ला – ध्येय निश्चित करून सातत्यपूर्ण अभ्यास, योग्य नियोजन आणि कठोर परिश्रम केल्यास यश मिळवता येते, हे वेहेरगाव येथील वीरा बोत्रे आणि पायल देशमुख या दोन विद्यार्थिनींनी सिद्ध केले आहे.
इन्स्टिट्यूट ऑफ चार्टर्ड अकाउंटंट्स ऑफ इंडिया (आयसीएआय) यांच्या वतीने घेण्यात आलेल्या सीए इंटरमिजिएट परीक्षेत वीराने ग्रुप एक आणि ग्रुप दोन, तर पायलने ग्रुप एकमध्ये यश संपादन केले. त्यांच्या यशामुळे वेहेरगावच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवला गेला आहे.
सीए ही देशातील आव्हानात्मक व्यावसायिक परीक्षांपैकी एक मानली जाते. या परीक्षेच्या तयारीसाठी सातत्यपूर्ण अभ्यास, वेळेचे नियोजन, विषयांची सखोल समज आणि नियमित सराव आवश्यक असतो. या सर्व बाबींच्या जोरावर दोन्ही विद्यार्थिनींनी यश मिळवले आहे.
वीरा आणि पायल यांच्या यशामुळे कुटुंबीय, नातेवाईक, वेहेरगावचे ग्रामस्थ तसेच कार्ला परिसरातील नागरिकांमध्ये आनंदाचे वातावरण आहे. दोघींचे सर्व स्तरांतून अभिनंदन होत असून, त्यांच्या पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या जात आहेत.
या दोन्ही विद्यार्थिनींचे यश परिसरातील इतर विद्यार्थ्यांसाठी प्रेरणादायी ठरणारे आहे. मोठे ध्येय साध्य करण्यासाठी नियमित अभ्यास, योग्य नियोजन, वेळेचा सदुपयोग आणि स्वतःवरील विश्वास महत्त्वाचा असतो. अपयश आले तरी खचून न जाता चुका सुधारून पुन्हा प्रयत्न करणे गरजेचे आहे. तसेच मोबाईलचा अनावश्यक वापर टाळून अभ्यासाला प्राधान्य दिल्यास यशाचा मार्ग सुकर होऊ शकतो, असा संदेश त्यांच्या यशातून मिळतो.
Temple halls: तीन गावांतील मंदिर सभामंडपांसाठी ३० लाखांचा निधी मंजूर

