सीए परीक्षांचे सुधारित वेळापत्रक जाहीर; ‘या’ तारखेला होणार परीक्षा

CA Exams Dates | भारत-पाकिस्तान युद्धजन्य परिस्थितीमुळे चार्टर्ड अकाउंटंट (सीए) परीक्षा पुढे ढकलण्यात आले होते. या निर्णयामुळे देशभरातील हजारो परीक्षार्थींमध्ये संभ्रमाचे वातावरण निर्माण झाले होते. अखेर इन्स्टिट्यूट ऑफ चार्टर्ड अकाउंटंट्स ऑफ इंडियाने (ICAI) सुधारित वेळापत्रक जाहीर केले आहे.
ICAIच्या अधिकृत घोषणेनुसार, आता पुढील परीक्षा १६ ते २४ मे या कालावधीत पार पडणार आहेत. सीए अंतिम, इंटरमीडिएट आणि आयएनटीटी-एटी (पीक्यूसी) या तीनही स्तरांच्या परीक्षांचा यात समावेश आहे. युद्धविरामानंतर या सुधारित तारखा निश्चित करण्यात आल्याचे ICAI ने स्पष्ट केले आहे. याआधी सीए परीक्षा ९ ते १४ मे दरम्यान घेतल्या जाणार होत्या. CA Exams Dates |
IMPORTANT ANNOUNCEMENT – Revised Schedule of ICAI Chartered Accountants Final, Intermediate & INTT-AT (PQC) Examinations, May 2025
For detailshttps://t.co/a5hI3J1PMJ pic.twitter.com/8ARYP85z4T— Institute of Chartered Accountants of India – ICAI (@theicai) May 10, 2025
आयसीएआयने म्हटले आहे की, परीक्षेच्या वेळा आणि केंद्रे आधीप्रमाणेच राहणार आहेत, त्यात कोणताही बदल होणार नाही. या परीक्षा त्यांच्या नियुक्त केंद्रांवर दुपारी 2 ते 5 आणि 6 या वेळेत घेतल्या जातील.’ याशिवाय मे सत्रासाठी सीए फाउंडेशनच्या परीक्षा 15, 17, 19 आणि 21 मे रोजी नियोजित वेळापत्रकानुसार घेतल्या जाणार आहेत.
हेही वाचा :

