पथदिवे बंद असल्याने केडगावसह उपनगरे अंधारात

नगर – केडगांव व उपनगरांमधील अनेक दिवसांपासून पथदिवे बंद अवस्थेत आहेत. त्यामुळे रात्री परिसरात अंधार पसरलेला असुन भुरट्या चोऱ्यांचे प्रमाण वाढत आहे. त्यामुळे तातडीने बंद असलेल्या पथदिव्यांची दुरुस्ती करून ते सुरु करावेत अशी मागणी नगरसेवक मनोज कोतकर यांनी महापालिकेचे उपायुक्त डॉ. प्रदीप पठारे यांच्याकडे केली आहे.
निवेदनात म्हंटले आहे की, केडगांव व उपनगरांमधील अनेक पथदिवे गेल्या अनेक दिवसांपासून बंद अवस्थेत आहेत. पथदिवे दुरुस्ती करणेकरीता साहित्य उपलब्ध होत नसल्यामुळे पथदिवे बंद आहेत. पथदिव्यांची दुरुस्ती करणेबाबत अनेकांनी तक्रार केल्या आहेत. मात्र त्याकडे सोयीस्कर दुर्लक्ष केले जाते.
पथदिव्यांच्या दुरुस्तीसाठी मोठ्या प्रमाणात खर्च करावा लागणार असुन एवढा खर्च आम्ही करु शकत नाही. महापालिकेच्या विद्युत विभागाकडे पथदिवे दुरुस्ती साहित्य उपलब्ध नसल्याचे सांगण्यात येते.
नागरिकांच्या मुलभूत समस्या प्राधान्याने सोडविने गरजेचे आहे. तसेच लोक प्रतिनिधी म्हणून जनतेने निवडणून दिले आहे. त्यांचे प्रश्न सोडविने आमचे काम आहे. त्यामुळे महानगरपालिकेने लवकरात लवकर विद्युत साहित्य उपलब्ध करुन, केडगांव व उपनगरांमधील बंद अवस्थेत आहेत. त्यामुळे परिसरात भुरट्या चोऱ्यांचे प्रमाण वाढले असून, महापालिकेने पथदिव्यांची तात्काळ दुरुस्ती करावी अशी मागणी नगरसेवक मनोज कोतकर यांनी निवेदनाद्वारे केली आहे.





