Nagar : केडगाव येथे नेत्र तपासणी व मोतीबिंदू शस्त्रक्रिया शिबीर
Updated On:

अहिल्यानगर : श्री कुंदनलाल तिलकचंद वासन चॅरिटेबल ट्रस्ट व आनंदऋषी नेत्रालय यांच्या वतीने गुरुवारी दि.16 जानेवारी रोजी केडगाव इंडस्ट्रीयल येथील वासन टोयोटा शोरुम येथे मोफत नेत्र तपासणी व मोतिबिंदू शस्त्रक्रिया शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे.
दृष्टीदोष असलेल्या गरजूंसाठी मागील 17 वर्षांपासून वासन उद्योग समूहाचे चेअरमन विजय वासन यांच्या मार्गदर्शनाखाली गरजूंसाठी या शिबिराचे आयोजन केले जात आहे. या शिबिराचा लाभ घेण्याचे आवाहन विजय वासन, तरुण वासन व जनक आहुजा यांनी केले आहे.
या शिबिरात विधानसभा निवडणुकीत मताधिक्याने निवडून आल्याबद्दल आ.शिवाजी कर्डिले व आ. संग्राम जगताप यांचा नागरी सत्कार केला जाणार आहे. मा.आ. अरुणकाका जगताप यांच्या अध्यक्षतेखाली हा कार्यक्रम पार पडणार आहे.





