Lekha Washington : नको त्या शब्दांनी हिनवलं; आता इम्रानच्या गर्लफ्रेंडचं सडेतोड उत्तर, नात्याविषयी पहिल्यांच बोलली
Lekha Washington : एका मुलाखतीत बोलताना लेखा वॉशिंग्टन म्हणाली की, अशा प्रकारचे शब्द महिलांना कमी लेखण्यासाठी आणि नियंत्रित करण्यासाठी वापरले जातात.

Lekha Washington : बॉलिवूड अभिनेता इम्रान खान आणि त्याची प्रेयसी लेखा वॉशिंग्टन यांचे नाते गेल्या काही वर्षांपासून चर्चेचा विषय ठरत आहे. सोशल मीडियावर अनेकदा ट्रोलिंगचा सामना करणाऱ्या लेखाने आता टीकाकारांना सेडतोड उत्तर दिले आहे. ‘घर तोडणारी’ आणि ‘चारित्र्यहीन’ अशा शब्दांनी महिलांना लक्ष्य करणे चुकीचे असल्याचे सांगत तिने समाजाच्या दुटप्पी मानसिकतेवर निशाणा साधला आहे.
एका मुलाखतीत बोलताना लेखा वॉशिंग्टन म्हणाली की, अशा प्रकारचे शब्द महिलांना कमी लेखण्यासाठी आणि नियंत्रित करण्यासाठी वापरले जातात. “हे शब्द माझी ओळख ठरवत नाहीत. मी स्वतःकडे इतरांच्या नजरेतून पाहत नाही आणि अशा टीकेमुळे माझे व्यक्तिमत्त्व बदलत नाही.” (Lekha Washington)
तिने पुढे सांगितले की, “ लोकं माझ्या अनेक वर्षांच्या कामाकडे आणि कलेतील योगदानाकडे दुर्लक्ष करून मला केवळ एका पुरुषाच्या नावाशी जोडून पाहतात, याचे दुःख वाटते.”
दरम्यान, इम्रान खाननेही यापूर्वी लेखाचा बचाव करत तिच्यावरील टीकेला विरोध केला होता. “लेखाला ‘घर तोडणारी’ म्हणणे हे केवळ स्त्रीविरोधी नाही, तर माझ्या स्वतःच्या निर्णयक्षमतेचाही अपमान आहे,” असे इम्रानने म्हटले होते. त्याने स्पष्ट केले होते की, पत्नी अवंतिका मलिकपासून विभक्त झाल्यानंतर लॉकडाऊनच्या काळात त्याची आणि लेखाची जवळीक वाढली. (Lekha Washington)

Lekha Washington : नको त्या शब्दांनी हिनवलं; आता इम्रानच्या गर्लफ्रेंडचं सडेतोड उत्तर, नात्याविषयी पहिल्यांच बोलली
लेखा आणि इम्रान एकमेकांना तब्बल १५ वर्षांपासून ओळखतात. दोघांचा मित्रपरिवार सारखाच असल्याने त्यांच्यात मैत्री होती आणि कोविड लॉकडाऊनच्या काळात त्यांचे नाते अधिक घट्ट झाले. लेखाने तिच्या आणि इम्रानच्या नात्यावर पहिल्यांदाच भाष्य केले. “ही एखादी परीकथेतील प्रेमकथा नाही. दोन तुटलेल्या व्यक्तींनी आयुष्य नव्याने उभं करण्याचा केलेला प्रयत्न आहे. माझे इम्रानवर मनापासून प्रेम आहे,” असे ती म्हणाली. (Lekha Washington)
पुढे ती म्हणाली, या प्रवासात तिचे कुटुंब आणि इम्रानची मुलगी इमारा यांचाही मोठा सहभाग आहे. त्यामुळे त्यांचे नाते अधिक समजूतदार आणि मजबूत झाले आहे.
इम्रान खानने ‘जाने तू या जाने ना’, ‘आय हेट लव्ह स्टोरीज’, ‘दिल्ली बेली’ आणि ‘ब्रेक के बाद’ या चित्रपटातील त्याच काम प्रेक्षकांच्या विशेष लक्षात आहे. तर लेखा वॉशिंग्टनने तमिळ आणि तेलुगू चित्रपटसृष्टीत आपल्या अभिनयाची चुणूक दाखवत स्वत: वेगळी ओळख निर्माण केली आहे.
इम्रान खान आणि अवंतिका मलिक यांनी २०११ मध्ये लग्न केले होते. मात्र, काही काळ एकत्र राहिल्यानंतर २०१९ मध्ये ते विभक्त झाले आणि नंतर त्यांचा घटस्फोट झाला. त्यानंतर इम्रान आणि लेखा वॉशिंग्टन यांच्यात प्रेमाचे नाते निर्माण झाले असून, दोघेही या कारणामुळे सतत चर्चेत असतात.
हेही वाचा : FIFA World Cup 2026: अवघ्या १८ तासांत ६.१ मिलियन व्ह्यूज; नोरा फतेहीच्या नव्या गाण्याची कमाल





