खळबळजनक ! मस्ती करणाऱ्यांचे नाव फळ्यावर लिहिले… विद्यार्थ्यांनी मॉनिटरला चाकूने भोसकले

नवी दिल्ली – शाळेमध्ये वर्गात विद्यार्थ्यांनी गोंधळ घालू नये यासाठी अनेकदा शिक्षक विद्यार्थ्यांमधून एकाची निवड मॉनिटर म्ह्णून करतात. वर्गात शांतात ठेवणे आणि गोंधळ गडबड करणाऱ्या विद्यार्थ्यांचे नाव फळ्यावर लिहिणे इतकेच काम मॉनिटरचे असते. मॉनिटरने वर्गात नाव लिहिल्याने त्याच्यावर धारधार शस्त्राने हल्ला केल्याची घटना समोर आली आहे.
शाळेमध्ये विद्यार्थ्यांमध्ये झालेल्या भांडणावरून प्रकरण एकमेंकावर हल्ल्यापर्यंत गेल्याचे समोर आले. दिल्लीतील संगम विहार येथील शाळेत विद्यार्थ्यांमध्ये हा राडा झाला. वर्गात मॉनिटरने गुंडगिरी करणाऱ्या विद्यार्थ्यांची नावे लिहिल्याने वर्गातील अनेकजण संतापले.
संतप्त विद्यार्थ्यांनी प्रथम मॉनिटरला नाव काढण्यास सांगितले, नंतर न पटल्याने त्यांनी मॉनिटरला चाकूने रक्तबंबाळ केले. यात पीडित विद्यार्थी गंभीर जखमी झाला. हल्ल्यानंतर जखमी विद्यार्थ्याचा संपूर्ण शर्ट रक्ताने माखला होता.सोबतच्या मुलांनी शाळा प्रशासनाला कळवल्यावर पीडित विद्यार्थ्याला तातडीने रुग्णालयात नेण्यात आले.
आरोपी आणि पीडित दोघेही अल्पवयीन विद्यार्थी असल्याचे सांगण्यात येत आहे. या घटनेचा व्हिडीओ देखील सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे, व्हिडीओतील विदारद दृश्य पाहून नेटकरी अनेक सवाल उपस्थित करत आहेत. लोक पीडित विद्यार्थ्याला हॉस्पिटलमध्ये कसे घेऊन जात असल्याचे व्हिडिओमध्ये दिसत आहे. या घटनेची माहिती पोलिसांना देण्यात आली असून पोलिसांनी या प्रकरणाचा तपास सुरू केला आहे.





