Pimpri : विद्यार्थ्यांनी ताणतणाव विरहीत जीवनशैली अंगीकारावी

चिंचवड : खेळामुळे विद्यार्थ्यांचा शारीरिक व मानसिक विकास होतो. शरीराला तंदुरुस्त ठेवण्यासाठी अभ्यासाबरोबर त्यांनी आवडत्या खेळात जास्तीत जास्त सहभाग सहभाग घेऊन ताणतणाव विरहीत जीवनशैली अंगीकारावी. असे आवाहन कमला एज्युकेशन सोसायटीचे संस्थापक सचिव डॉ. दीपक शहा यांनी केले.
कमला एज्युकेशन सोसायटी संचलित प्रतिभा ज्यूनिअर कॉलेज मधील १५०० विद्यार्थ्यांच्या उपस्थितीत प्राधिकरण येथील कै. संजय काळे क्रीडा संकुल मैदानावर क्रीडा महोत्सव २०२४ उत्साहात पार पडला. १०० मीटर धावणे, गोळा फेक, सीट अँड रिच, पुशप आदी क्रीडा स्पर्धात मोठ्या संख्येने महाविद्यालयातील मुला-मुलींनी सहभाग नोंदवीला.
स्पर्धेपूर्वी डॉ. दीपक शहा ज्युनियर कॉलेजच्या क्रीडा शिक्षक व प्राध्यापकांच्या बैठकीत मार्गदर्शन केले.उपप्राचार्या डॉ. वनिता कुऱ्हाडे, क्रीडा विभाग प्रमुख प्रा. शबाना शेख, क्रीडा शिक्षक डॉ. अभय पोद्दार, समन्वयिका डॉ. सुनिता पटनाईक, प्रा. जस्मिन फरास, प्रा. वैशाली देशपांडे यांच्या समवेत शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी क्रीडा महोत्सव यशस्वी करण्यासाठी परिश्रम घेतले.





