Rahul Gandhi: “भाजपच्या धोरणांमुळे विद्यार्थी त्रस्त”; MPSC विद्यार्थ्यांच्या आंदोलनाला राहुल गांधींचा पाठिंबा
Rahul Gandhi: राहुल गांधींचा सरकारवर हल्लाबोल

Rahul Gandhi: महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या (MPSC) परीक्षेच्या पद्धतीतील कथित गैरप्रकारांविरोधात विद्यार्थ्यांचे आंदोलन तीव्र झाले आहे. काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी विद्यार्थ्यांच्या या आंदोलनाला पाठिंबा देत केंद्र आणि राज्यातील भाजप सरकारवर निशाणा साधला.
महाराष्ट्रात हजारो विद्यार्थी रस्त्यावर उतरून शांततापूर्ण मार्गाने आंदोलन करत आहेत. विद्यार्थ्यांचा हा संताप केवळ एखाद्या परीक्षेपुरता किंवा भरतीपुरता मर्यादित नसून, संपूर्ण प्रशासकीय यंत्रणेवरून त्यांचा उडालेला विश्वास दर्शवतो, अशा शब्दांत राहुल गांधी यांनी केंद्र आणि राज्यातील महायुती सरकारवर निशाणा साधला आहे.
सोशल मीडिया प्लॅटफॉर्म ‘एक्स’वर (ट्विटर) पोस्ट करत त्यांनी स्पर्धा परीक्षा देणाऱ्या विद्यार्थ्यांच्या प्रश्नांवरून सरकारवर हल्लाबोल केला आहे.
महाराष्ट्र में हजारों छात्र सड़कों पर हैं, शांतिपूर्ण तरीके से आंदोलनरत हैं – इसकी वजह सिर्फ एक परीक्षा या भर्ती नहीं, पूरे सिस्टम से टूट चुका भरोसा है।
चाहे वो केंद्र की हो या राज्य की, BJP सरकार से हर छात्र त्रस्त है। पेपर लीक, रुकी हुई भर्तियां, शिक्षा की असहनीय लागत, हॉस्टल…
— Rahul Gandhi (@RahulGandhi) September 6, 2026
प्रत्येक मागणी पूर्णपणे रास्त (Rahul Gandhi)
राहुल गांधी यांनी सोशल मीडिया प्लॅटफॉर्म ‘एक्स’वर लिहीले की, “केंद्र सरकार असो वा राज्य सरकार, भाजपच्या धोरणांमुळे विद्यार्थी त्रस्त आहेत. त्यांनी पेपरफुटी, रखडलेल्या भरती प्रक्रिया, शिक्षणाचा वाढता खर्च, वसतिगृहांची ढासळलेली व्यवस्था, निकृष्ट दर्जाचे जेवण यांमुळे विद्यार्थ्यांचे हाल होत आहेत. तसेच डीबीटी’ (डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफर) योजनेतील कथित गैरव्यवहारांमुळे विद्यार्थ्यांना त्यांचे हक्क मिळत नाही, असे सांगत त्यांनी यायमुद्द्यांकडे लक्ष वेधले. Rahul Gandhi
वसतिगृहांची दयनीय अवस्था आणि जेवणाचा खालावलेला दर्जा यांमुळे विद्यार्थ्यांचे हाल होत आहेत. तसेच ‘डीबीटी’ (डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफर) योजनेतील कथित गैरव्यवहारांमुळे विद्यार्थ्यांना त्यांचे हक्क मिळत नसल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
त्यांनी पुढे म्हटले की, आता MPSC सारख्या घटनात्मक संस्थेवर ताबा मिळवून तिची विश्वसनीयताही धोक्यात आणली गेली आहे. विद्यार्थ्यांच्या उज्ज्वल भविष्याशी जोडलेली त्यांची प्रत्येक मागणी पूर्णपणे रास्त आहे. सरकारने विद्यार्थ्यांचा आवाज ऐकून तत्काळ कारवाई केली पाहिजे, अन्यथा न्याय मिळेपर्यंत विद्यार्थ्यांचा हा आवाज आणखी तीव्र होत जाईल, असा इशाराही त्यांनी दिला. Rahul Gandhi
हेही वाचा:
Pimpri Chinchwad News : महापारेषण कंपनीच्या चिंचवड अतिउच्चदाब वीज उपकेंद्रात आग





