Letter to Ajit Pawar : सहावीच्या चिमुरडीचे उपमुख्यमंत्री अजित पवारांना साकडे; म्हणाली…
अनेक मूलभूत समस्यांनी त्रस्त झालेल्या जिल्हा परिषदेच्या एका विद्यार्थिनीने थेट राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार (Letter to Ajit Pawar) यांना पत्र लिहून आपल्या व्यथा मांडल्या आहेत.

Ajit Pawar : शाळेच्या मोडकळीस आलेल्या भिंती, पिण्याच्या पाण्याचा प्रश्न आणि खेळाच्या मैदानाचा अभाव यांसारख्या अनेक मूलभूत समस्यांनी त्रस्त झालेल्या जिल्हा परिषदेच्या एका विद्यार्थिनीने थेट राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार (Letter to Ajit Pawar) यांना पत्र लिहून आपल्या व्यथा मांडल्या आहेत.
इयत्ता सहावीत शिकणाऱ्या या मुलीच्या धाडसाची आणि पत्रातील (Letter to Ajit Pawar) गांभीर्याची दखल घेत प्रशासनाने तत्काळ पावले उचलली असून, संबंधित शाळेच्या स्थितीची पाहणी करण्यासाठी एका विशेष समितीची स्थापना केली आहे.
संबंधित विद्यार्थिनीने अत्यंत भावूक पण परखड शब्दात आपल्या शाळेतील समस्यांकडे उपमुख्यमंत्र्यांचे लक्ष (Letter to Ajit Pawar) वेधले होते. आम्हाला शिक्षण घ्यायचे आहे, पण आमच्या शाळेत साध्या सोयीसुविधाही उपलब्ध नाहीत, अशा आशयाचे पत्र समाजमाध्यमांवर आणि राजकीय वर्तुळात चर्चेचा विषय ठरले.
उपमुख्यमंत्री कार्यालयाने या पत्राची तातडीने दखल घेत संबंधित जिल्हा प्रशासनाला अहवाल सादर करण्याचे निर्देश दिले. त्यानुसार, शिक्षण विस्तार अधिकारी आणि संबंधित अभियंत्यांचा समावेश असलेली एक चौकशी समिती गठीत करण्यात आली आहे.
ही समिती शाळेला प्रत्यक्ष भेट देऊन तेथील पिण्याचे पाणी, स्वच्छतागृहांची अवस्था आणि इमारतीचे बांधकाम या बाबींचा सविस्तर आढावा घेणार आहे. शाळेतील सोयीसुविधांचा अभाव केवळ एका गावापुरता मर्यादित नसून, ही अनेक जिल्हा परिषद शाळांची प्रातिनिधिक समस्या असल्याचे या निमित्ताने पुन्हा एकदा समोर आले आहे.
हे पण वाचा : “मुंबईत सत्ताधाऱ्यांच्या सोयीप्रमाणेच लॉटरी” किशोरी पेडणेकर आक्रमक
मोठी बातमी! भारताशी पंगा घेणं बांगलादेशला पडलं महाग! अखेर टी-२० विश्वचषकातून घेतली माघार
स्वतः चहा करुन लोकांना दिला आहे का?; मल्लिकार्जुन खर्गे यांचा मोदींना सवाल






