#EngvInd : ब्रॉडचा कोहलीला इशारा
Updated On:

लंडन – जेम्स अँडरसनला उद्देशून खोचक वक्तव्य करणे भारताचा कर्णधार विराट कोहली याला येत्या काळात महागात पडेल, असा इशारा इंग्लंडचा वेगवान गोलंदाज स्टुअर्ट ब्रॉड याने दिला आहे.
दुसऱ्या कसोटी सामन्यात कोहली फलंदाजी करत असताना अँडरसनने डेंजर एरियात सातत्याने पाऊल ठेवल्यामुळे कोहली संतापला व हे तुझ्या घरातील अंगण नाही हे विसरला आहेस का, अशी विचारणा करत आपला रोष व्यक्त केला होता.
त्यांच्यात झालेले संभाषण स्टम्पमध्ये असलेल्या माईकमुळे सगळ्यांनाच ऐकू आले. त्यावर ब्रॉडने नाराजी व्यक्त केली आहे. कोहलीसारख्या खेळाडूला हे वर्तन शोभत नाही, त्याने यात बदल केला नाही तर येत्या काळात त्याला त्याचे परिणाम भोगावे लागतील, असेही ब्रॉडने म्हटले आहे.





