पुणे जिल्हा | पिके जागवण्याचा संघर्ष : लाखो रुपयांचे काढले कर्ज

पळसदेव, (वार्ताहर) – उजनी धरणाची पाण्याची पातळी उणे 50 टक्यांवर गेल्यामुळे उजनी काठावरील शेतकरी अगदी मेटाकुटीला आला आहे. अनेक ठिकाणच्या उजनी पात्रात पाणी विद्युत पंपापर्यंत आण्यासाठी केलेल्या चार्या बंद पडल्याने बळीराजा हवालदिल झाला आहे.
मोकळ्या पडलेल्या नदीपात्राकडे पाहून बळीराजाची अगदी दयनीय अवस्था झाली आहे; मात्र काही ठिकाणी शेतकर्यांनी आजून अशा सोडली नाही आजून चार्या खोल करण्यासाठी शेतकर्यांनी लाखो रुपये जमा करून पुन्हा पोकलेच्या साह्याने चारीत साचलेला गाळ काढून पुन्हा चार्या खोल करण्यासाठी काम सुरु केलं आहे .
उजनी पात्रात नदीकाठावर पळसदेव भागात शेतकर्यांनी जेसीबी व पोकलेनच्या साह्याने पुन्हा पाण्यासाठी संघर्ष सुरू केला आहे. पावसाळा अगदी तोडणावर आला असताना देखील ऐन पावसाळ्याच्या तोंडावर पोटच्या पोरासारखी जपलेली पीक जाळून जाण्याच्या भीतीने पाणी मिळण्यासाठी वाट्टेल ते करण्यास बळीराजा तयार झाला आहे. अगदी कर्ज काढून चार्या खोल करण्याचं काम सुरु केले आहे.
सरकार मूक गिळून गप्प
बळीराजाची एवढी दयनीय अवस्था असताना देखील सरकार; मात्र याबाबत मूक गिळून गप्प बसले आहे. केवळ मतांसाठी उजनी काठावरील शेतकर्याचा वापर केला जात आहे; मात्र त्यांच्या व्यथा समजावून घेण्यास लोकप्रतिनिधींना वेळ नाही. त्यामुळे येणार्या काळात या लोकप्रतिनिधींना त्यांची जागा दाखून देऊ, अशी भूमिका उजनी काठावरील शेतकरी व्यक्त करत आहे.





