तुर्की, ग्रीसमध्ये भूकंपाचे जोरदार धक्के

नवी दिल्ली : तुर्की आणि ग्रीस किनारपट्टी दरम्यान एजियन समुद्रात जोरदार भूकंपाचे धक्के जाणवले. भूकंपामुळे आतापर्यंत 22 लोकांचा मृत्यू झाला असून 700 हून अधिक जण जखमी झाले असल्याचे सांगण्यात येत आहे. इस्तांबूलमधील इजमीर जिल्ह्यात सेफेरिसारमध्येही सौम्य प्रमाणात त्सुनामीची लाट आली. त्याच वेळी ग्रीसच्या सामोस द्वीपकल्पात 4 लोक जखमी झाले असून जखमींची संख्या वाढण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.
Another tsunami footage from the earthquake in Izmir province of Turkey.
This one is really dangerous pic.twitter.com/62zfddWSi8
— Ragıp Soylu (@ragipsoylu) October 30, 2020
युरोपियन-मध्यसागर भूकंप विज्ञान केंद्राने माहितीनुसार, सुरुवातीला भूकंपाची तीव्रता 6.9 असून त्याचा केंद्रबिंदू ग्रीसच्या ईशान्य दिशेच्या सामोस बेटावर होता. तर अमेरिकेच्या भूगर्भीय सर्वेक्षणानुसार भूकंपाची तीव्रता 7.0 इतकी होती. तुर्कीच्या आपत्ती व्यवस्थापन विभागानुसार भूकंपाचे केंद्रस्थान एजियन समुद्रात 16.5 किमी खाली होते. भूकंपाची तीव्रता 6.6 नोंदवण्यात आली आहे.
Wow a mini tsunami occurred in Izmir’s Seferhisar after a 6.6 magnitude earthquake pic.twitter.com/uRNz0PrXeZ
— Ragıp Soylu (@ragipsoylu) October 30, 2020
भूकंपात सर्वाधिक नुकसान तुर्कीच्या इजमीर शहरात झाले आहे. पश्चिम तुर्कीच्या इजमीर प्रांतातील अनेक इमारती भूकांपामुळे जमीनदोस्त झाल्या आहेत. बचाव कार्य करणारे जवानही तेथे तैनात करण्यात आले आहेत. मध्य इज्मीरमध्ये अनेक ठिकाणी हवेत धूर पसरल्याचे फोटोही समोर आले आहेत.
Wow a mini tsunami occurred in Izmir’s Seferhisar after a 6.6 magnitude earthquake pic.twitter.com/uRNz0PrXeZ
— Ragıp Soylu (@ragipsoylu) October 30, 2020
ढिगाऱ्यातून जवळपास 70 जणांना बाहेर काढण्यात आले असल्याची माहिती इजमीरचे राज्यपाल यावूज सलीम कोसगार यांनी दिली. तसेच अनेक इमारतींचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. भूकंपामुळे क्षणात होत्याचे नव्हते झाले आहे. भूकंपग्रस्तांच्या मदतीसाठी रुग्णवाहिका व हेलिकॉप्टरचे सहाय्य घेतले जात आहे.
A better footage from Izmir of Turkey that shows the sea water has withdrawn after the quake pic.twitter.com/SwhA5VpEzj
— Ragıp Soylu (@ragipsoylu) October 30, 2020
इजमीरमध्ये 38 रुग्णवाहिका, दोन हेलिकॉप्टर रुग्णवाहिका आणि 35 बचाव दल कार्यरत आहेत. किमान 12 इमारतींमध्ये सध्या बचावकार्य सुरू आहे. जानेवारीमध्ये तुर्कीच्या सिव्रीस येथे झालेल्या भूकंपात 30 हून अधिक लोक ठार तर 1600 हून अधिक लोक जखमी झाले होते. त्यापूर्वी 1999 साली तुर्कीच्या इजमित शहरात भूकंपात 17000 नागरिक ठार झाले होते.





