Turkey Earthquake | तुर्कीमध्ये सोमवारी पहाटेच्या सुमारास भूंकपाचे तीव्र झटके जाणवले. 6.1 रिश्टर स्केल भूकंपाची तीव्रता मोजण्याच आली आहे. भूकंपामुळे साधारणपणे 700 हून अधिक इमारतींचं मोठं नुकसान झालं असून 22 जण जखमी असल्याची माहिती मिळाली आहे. काही इमारती पत्त्याच्या बंगल्यासारख्या कोसळल्या असून जमीनदोस्त झाल्या आहेत. तुर्कीची आर्थिक राजधानी असलेल्या इस्तंबूल आणि पर्यटन स्थळ असलेल्या इझमीर पर्यंत भूकंपाचे धक्के जाणवले. बालिकेसिर भागातील सिंदिरगी या शहरात भूकंपाचे केंद्रबिंदू असल्याचे आपत्ती आणि आपत्तकालीन व्यवस्थापन संस्थेने सांगितले. भूंकपाचे झटके राजधानी इस्तंबूल, बुरसा, मनिसा आणि इजमिर या भागांमध्ये जाणवले. भूकंपाची तीव्रता प्रचंड असल्याने नागरिकांमध्ये मोठी घबराट पसरली. Turkey Earthquake | समोर आलेल्या माहितीनुसार, या आपत्तीत कोणतीही जीवितहानी झालेले नसल्याचे समजते. दरम्यान, तुर्कीतील मोठा भाग हा भूकंपप्रवण क्षेत्रात येतो. त्यामुळे या देशात भूकंपाचे वारंवार धक्के जाणवतात. गेल्या दोन वर्षांत येथे भूकंपाने नागरिकांमध्ये भीती निर्माण झाली आहे. गेल्या तीन महिन्यांपासून या भागात सातत्याने भूकंपाचे धक्के बसत असल्याने नागरीक जीव मुठीत घेऊन जगत आहेत. Turkey Earthquake | ऑगस्टपासून सातत्याने भूकंपाचे झटके तुर्की भौगोलिकदृष्ट्या अनेक फॉल्ट लाईन्सवर वसलेला असल्याने हा परिसर भूकंपासाठी अतिसंवेदनशील आहे. जगातील काही मोजक्या देशात सातत्याने भूकंपाचे झटके जाणवतात. त्यात तुर्कीचा समावेश आहे. ऑगस्ट महिन्यात तुर्कीतील उत्तर आणि पश्चिमी भागातील बालीकेसीर या राज्यातील सिंदरगीमध्ये 6.1 तीव्रतेचा भूकंप आला होता. यामध्ये एका व्यक्तीचा मृत्यू झाला होता. तर अनेक जण जखमी झाले होते. यानंतर सातत्याने भूकंपाचे झटके जाणवत आहेत. याशिवाय सप्टेंबरमध्ये तुर्कीतील बालिकेसीर या राज्यात 4.9 तीव्रतेचा भूंकप आला होता. आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाने सांगितले की, बालिकेसीर या राज्यातील सिंदिरगीमध्ये भूंकपाचे केंद्रबिंदू हे 7.72 किलोमीटर खोल होते. 2023च्या विनाशकारी भूकंपाने सर्व उद्ध्वस्त यापूर्वी, फेब्रुवारी 2023 मध्ये दक्षिण-पश्चिम तुर्कीमध्ये आलेल्या 7.8 तीव्रतेच्या विनाशकारी भूकंपाने अँटिओकला पूर्णपणे उद्ध्वस्त केले होते आणि त्यात किमान 53,000 लोकांचा मृत्यू झाला होता. शेजारील सीरियामधील उत्तरी भागात 6,000 हून अधिक नागरिक ठार झाले होते. Turkey Earthquake | हेही वाचा: बच्चू कडूंचा सरकारवर ‘प्रहार’; शेतकऱ्यांच्या कर्जमाफीसाठी नागपूरात भव्य ‘ट्रॅक्टर मोर्चा’