Satara: साताऱ्यात न्यायालयीन कर्मचाऱ्यांचा संप सुरु
Satara या संपात जिल्हा न्यायालयीन कर्मचारी संघटना, न्यायालयीन लघुलेखक संघटना, बेलिफ कर्मचारी संघटना, चतुर्थ श्रेणी कर्मचारी संघटना तसेच जिल्हा व तालुका न्यायालयांतील कर्मचारी सहभागी झाले आहेत. दरम्यान, न्यायालयीन कर्मचाऱ्यांच्या मागण्या रास्त असून जिल्हा वकील बार असोसिएशननेही या संपाला संपूर्ण पाठिंबा दर्शविला आहे.

Satara: न्यायालयातील कर्मचाऱ्यांप्रमाणे सुधारित वेतनश्रेणी लागू करावी, या प्रमुख मागणीसाठी जिल्ह्यातील न्यायालयीन कर्मचाऱ्यांनी आजपासून (दि. १७) पुकारलेल्या बेमुदत संपात जिल्हा न्यायालयासह सर्व तालुका न्यायालयांमधील कर्मचारी मोठ्या संख्येने सहभागी झाले आहेत.
राज्य न्यायालयीन कर्मचारी महासंघाच्या नेतृत्वाखाली हा राज्यव्यापी संप सुरू करण्यात आला आहे. दुय्यम न्यायालयीन कर्मचाऱ्यांना उच्च न्यायालयातील कर्मचाऱ्यांप्रमाणे सुधारित वेतनश्रेणी लागू करावी आणि समान कामासाठी समान वेतन या तत्त्वाची अंमलबजावणी करावी, अशी कर्मचाऱ्यांची प्रमुख मागणी आहे. मुंबई उच्च न्यायालयाने ३१ जानेवारी २०२५ रोजी सुधारित वेतनश्रेणीबाबत शासनाकडे प्रस्ताव पाठविला होता. मात्र, २१ महिने उलटूनही शासनाने कोणताही ठोस निर्णय घेतलेला नाही. त्यामुळे कर्मचाऱ्यांमध्ये नाराजी वाढली. यापूर्वी काळ्या फिती लावून कामकाज, निवेदने आणि सामूहिक रजा आंदोलन अशा विविध मार्गांनी शासनाचे लक्ष वेधण्याचा प्रयत्न करण्यात आला. मात्र, मागण्या प्रलंबित राहिल्याने अखेर बेमुदत संपाचा निर्णय घेण्यात आला.
या संपात जिल्हा न्यायालयीन कर्मचारी संघटना, न्यायालयीन लघुलेखक संघटना, बेलिफ कर्मचारी संघटना, चतुर्थ श्रेणी कर्मचारी संघटना तसेच जिल्हा व तालुका न्यायालयांतील कर्मचारी सहभागी झाले आहेत. दरम्यान, न्यायालयीन कर्मचाऱ्यांच्या मागण्या रास्त असून जिल्हा वकील बार असोसिएशननेही या संपाला संपूर्ण पाठिंबा दर्शविला आहे. वाढता कामाचा ताण, अपुरे मनुष्यबळ, रिक्त पदे आणि संगणकीय व मॅन्युअल अशा दुहेरी पद्धतीने काम करण्याची सक्ती यामुळे कर्मचाऱ्यांच्या अडचणी वाढत असल्याचे सांगण्यात आले. शासनाने उच्च न्यायालयाप्रमाणे सुधारित वेतनश्रेणी लागू करण्याबाबत तातडीने निर्णय घ्यावा, अशी मागणी कर्मचाऱ्यांनी केली आहे. जोपर्यंत मागण्या मान्य होत नाहीत, तोपर्यंत बेमुदत संप सुरूच ठेवण्याचा निर्धार न्यायालयीन कर्मचाऱ्यांनी व्यक्त केला आहे. न्यायालयीन लिपिक संघटना वर्ग 3 अध्यक्ष सतीश जाधव, लघुलेखक संघटना अध्यक्ष संजय गुरव, जिल्हा बेलीफ संघटना अध्यक्ष अमित भोसले, जिल्हा वर्ग चार संघटना अध्यक्ष अमर कुडाळकर यांच्यासह कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
जिल्हा बार असोसिएशनने दिला आंदोलनाला पाठिंबा
या संपात जिल्हा न्यायालयीन कर्मचारी संघटना, न्यायालयीन लघुलेखक संघटना, बेलिफ कर्मचारी संघटना, चतुर्थ श्रेणी कर्मचारी संघटना तसेच जिल्हा व तालुका न्यायालयांतील कर्मचारी सहभागी झाले आहेत. दरम्यान, न्यायालयीन कर्मचाऱ्यांच्या मागण्या रास्त असून जिल्हा वकील बार असोसिएशननेही या संपाला संपूर्ण पाठिंबा दर्शविला आहे.





