Satara: मुख्यमंत्री बळीराजा पाणंद रस्ते योजना शेतकर्यांसाठी फायदेशीर
Satara शहापूर, ता. सातारा येथे मुख्यमंत्री बळीराजा शेत पाणंद रस्ते योजनेतून सातारा जिल्ह्यातील पहिल्या रस्त्याच्या कामाचा शुभारंभ ना. शिवेंद्रसिंहराजे यांच्या हस्ते करण्यात आला. 28 लाख रुपये निधीतून 2.2 किलोमीटर लांबीचा रस्ता केला जाणार आहे. रस्त्याच्या कामाच्या शुभारंभ प्रसंगी ना. शिवेंद्रसिंहराजे बोलत होते.

Satara: मुख्यमंत्री बळीराजा शेत पाणंद रस्ते योजना ही महाराष्ट्र शासनाची शेतकर्यांसाठीची महत्त्वाकांक्षी योजना आहे. या योजनेतून ग्रामीण भागातील शेतरस्त्यांचे मजबुतीकरण करण्यात येणार आहे. यामुळे पेरणी, कापणी तसेच शेतीमालाची वाहतूक करणे अधिक सुलभ होणार आहे. शेतकर्यांना वर्षभर बारमाही, मजबूत आणि दर्जेदार रस्ते उपलब्ध करून देणे हा या योजनेचा मुख्य उद्देश असून ही योजना शेतकर्यांसाठी फायदेशीर ठरेल, असा विश्वास ना. शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनी व्यक्त केला.
शहापूर, ता. सातारा येथे मुख्यमंत्री बळीराजा शेत पाणंद रस्ते योजनेतून सातारा जिल्ह्यातील पहिल्या रस्त्याच्या कामाचा शुभारंभ ना. शिवेंद्रसिंहराजे यांच्या हस्ते करण्यात आला. 28 लाख रुपये निधीतून 2.2 किलोमीटर लांबीचा रस्ता केला जाणार आहे. रस्त्याच्या कामाच्या शुभारंभ प्रसंगी ना. शिवेंद्रसिंहराजे बोलत होते.
यावेळी जिल्हाधिकारी संतोष पाटील, प्रांताधिकारी आशिष बारकूल, तहसीलदार समीर यादव, सातारा जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष राजू भोसले, सदस्य सर्जेराव सावंत, पूजा मोरे, कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती विक्रम पवार, अरविंद चव्हाण, पंचायत समिती सदस्य प्रमिला सुतार, कोमल दळवी, समितीचे अध्यक्ष श्रीरंग देवरुखे, सदस्य अश्विनी शेळके, सरपंच मधुकर माने, शंकर सकटे, सतीश माने, श्रावण गायकवाड, हेमंत माने, सारिका माने, लालासो सकटे, सुभाष माने, सुनीता गायकवाड, संभाजी इंदलकर यांच्यासह विविध मान्यवर आणि ग्रामस्थ उपस्थित होते.
ना. शिवेंद्रसिंहराजे म्हणाले, या योजनेचा शुभारंभच शहापूर येथे होत असून सातारा जिल्ह्यातला पहिला पाणंद रस्त्याचे काम सुरु झाले आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी ही योजना शेतकर्यांच्या फायद्यासाठीच आणली आहे. कोणते रस्ते घ्यायचे याचा अधिकार समितीला देण्यात आला आहे. याचा फायदा शेतकर्यांना होणार आहे. योजना आल्याने शेत रस्त्याची कटकट राहणार नाही. सातारा- जावलीसाठी या योजनेतून 5 कोटी निधी मिळाला आहे. 18 गावे पहिल्या टप्प्यात घेण्यात आली असून त्यातून 24 किलोमीटर रस्ते पूर्णत्वाला जाणार आहेत. पुढचा निधी आला की पुढची गावे, रस्ते टप्प्याटप्प्याने घेतली जातील. काम सुरु असताना कामावर लक्ष ठेवणे हे तुमचे काम आहे. काम झाल्यावर तक्रारी करू नका. शहापूरमध्ये एक कोटीची कामे झाली असून 50 लाखाची कामे सुरु आहेत. दळणवळण सुकर होण्यासाठी शहापूर- उपाली बंधार्यावरील नवीन पुलासाठी 20 कोटी निधी उपलब्ध केला असून हेही काम लवकरच सुरु होईल.





