श्रद्धा कपूरला लेहेंगा घालून रॅम्प वॉक करणे झाले,’कठीण’

Entertainment । अभिनेत्री श्रद्धा कपूरने नुकताच नवी दिल्लीत रॅम्प वॉक केला. या रॅम्प वॉकचे अनेक व्हिडिओ आणि फोटो सोशल मीडियावर समोर आले आहे. यात ती सुंदर दिसत असली तरी तिला रॅम्पवर नीट चालता येत नसल्याचे चाहत्यांच्या लक्षात आले. श्रद्धाने क्रीम रंगाचा लेहेंगा परिधान केला होता. एका पापाराझीने इंस्टाग्रामवर एक व्हिडिओ शेअर केला आहे, ज्यामध्ये श्रद्धा रॅम्पवर चालत आहे, नंतर ती हसते आणि वेगवेगळ्या पोझ देते.
View this post on Instagram
व्हायरल होणाऱ्या व्हिडिओत चालताना श्रद्धा कपूर दचकत होती आणि तिला चालताना त्रास होत असल्याचे स्पष्ट दिसत होते. यावर प्रतिक्रिया देताना एका वापरकर्त्याने म्हटले,’ती नेहमीप्रमाणेच शानदार दिसत आहे, परंतु असे दिसते की तिला त्या लेहेंग्यात चालताना त्रास होत आहे. सोशल मीडिया युजर्स तिच्या या व्हिडिओवर संमिश्र प्रतिक्रिया देत आहे.
अभिनेत्री श्रद्धा कपूर वर्कफ्रंटबाबत सांगायचे झाल्यास, श्रद्धा सध्या ‘स्त्री 2’ च्या यशाचा आनंद घेत आहे, ज्यामध्ये राजकुमार राव, अपारशक्ती खुराना, अभिषेक बॅनर्जी आणि पंकज त्रिपाठी देखील आहेत. चित्रपटाने रिलीजच्या अवघ्या 9 दिवसांत भारतात 300 कोटी रुपयांचा टप्पा ओलांडला आहे, ज्यामुळे तो 2024 मधील सर्वाधिक कमाई करणारा भारतीय चित्रपट बनला आहे. श्रद्धा लवकरच ‘चालबाज इन लंडन’ आणि ‘चंदा मामा दूर’मध्ये दिसणार आहे.





