Parineeti Chopra : स्ट्रेच मार्क्स, वाढलेलं वजन…कतरिनाच्या ट्रोलिंगवर परिणीती चोप्राचा पारा चढला!
Parineeti Chopra : अभिनेत्री परिणीती चोप्रानेही या मुद्द्यावर आपले रोखठोक मत व्यक्त करत टीका करणाऱ्यांना फटकारले आहे.

Parineeti Chopra : प्रसिद्ध अभिनेत्री कतरिना कैफ सध्या तिच्या वाढलेल्या वजनावरून सोशल मीडियावर ट्रोल होत आहे. नोव्हेंबर २०२५ मध्ये कतरिनाने एका गोंडस मुलाला जन्म दिला. आई झाल्यानंतर तिच्या शरीरात झालेल्या बदलांवरून सोशल मीडियावर तिला मोठ्या प्रमाणावर ट्रोलिंगचा सामना करावा लागत आहे.
या ट्रोलिंगनंतर आता बॉलिवूडमधील कलाकारांकडूनही प्रतिक्रिया उमटू लागल्या आहेत. अभिनेत्री परिणीती चोप्रानेही या मुद्द्यावर आपले रोखठोक मत व्यक्त करत टीका करणाऱ्यांना फटकारले आहे.
आई झाल्यानंतर महिलेच्या शरीरात होणारे बदल हे पूर्णपणे नैसर्गिक असतात. त्यामुळे तिच्या वाढलेल्या वजनावर किंवा शरीरातील बदलांवर नकारात्मक टिप्पणी करणं योग्य नाही, असे परिणीतीने म्हटले आहे. (Parineeti Chopra)
एका वृत्तसंस्थेला दिलेल्या मुलाखतीत परिणीतीने सोशल मीडिया ट्रोलिंगबाबत भाष्य केले. ती म्हणाली, “मी सोशल मीडियावर फारसा वेळ घालवत नाही. त्यामुळे लोक माझ्याबद्दल काय बोलतात किंवा काय लिहितात, याकडे माझं फारसं लक्ष जात नाही. माझ्यासाठी माझं आयुष्य, कुटुंब आणि जवळची माणसं महत्त्वाची आहेत. त्यामुळे अनोळखी व्यक्तींच्या मतांवर वेळ किंवा मानसिक ऊर्जा खर्च करण्याची माझी इच्छा नाही.”

Parineeti Chopra : स्ट्रेच मार्क्स, वाढलेलं वजन…कतरिनाच्या ट्रोलिंगवर परिणीती चोप्राचा पारा चढला!
बॉडी शेमिंगबाबत बोलताना परिणीतीने सवाल केला की, “बाळाला जन्म दिल्यानंतर स्त्रीच्या शरीरात होणाऱ्या बदलांकडे नकारात्मक नजरेने का पाहिलं जातं? नऊ महिने बाळाला पोटात वाढवल्यानंतर शरीरात बदल होणं स्वाभाविक आहे. स्ट्रेच मार्क्स, वाढलेलं वजन किंवा शरीरातील इतर बदल हे लाज वाटण्यासारखे नसून, मातृत्वाचा नैसर्गिक भाग आहेत, अशा शब्दांत तिने टीकाकारांना सुनावले. ( Parineeti Chopra)
दरम्यान, परिणीतीने स्वतःही मातृत्वाचा अनुभव घेतला आहे. परिणीती चोप्रा आणि तिचा पती राघव चड्ढा यांनी ऑक्टोबर २०२५ मध्ये त्यांच्या पहिल्या मुलाचं स्वागत केले. आई झाल्यानंतर काही काळ कामापासून ब्रेक घेतल्यानंतर परिणीती पुन्हा अभिनयाच्या क्षेत्रात सक्रिय झाली आहे.
परिणीतीची ‘शाक: ट्रस्ट नो वन’ ही थ्रिलर वेबसीरिज २४ सप्टेंबर रोजी नेटफ्लिक्सवर प्रदर्शित होत आहे. या मालिकेत ती नऊ वर्षांपूर्वी बेपत्ता झालेल्या मुलीचा शोध घेणाऱ्या आईची भूमिका साकारत आहे. विशेष म्हणजे या वेबसिरीजद्वारे परिणीती ओटीटीच्या विश्वात पदार्पण करत आहे.
JP Morgan: ‘अमेरिकेकडून भारताला…’ ; टॅरिफवरून जेपी मॉर्गनच्या सीईओंचा ट्रम्प यांना मोठा सल्ला





