Strait of Hormuz: होर्मुझची सामुद्रधुनी इराणकडून ‘या’ ५ मित्र देशांसाठीच खुली ; भारताव्यतिरिक्त इतर ४ देश कोणते? ,वाचा
Strait of Hormuz: अमेरिका-इराण युद्धामुळे जागतिक तेल संकटाचा धोका निर्माण झाला आहे. दरम्यान, इराणने मित्र देशांना होर्मुझच्या सामुद्रधुनीतून जाण्याची परवानगी देणार असल्याचे जाहीर केले आहे.

Strait of Hormuz: अमेरिका-इराण युद्धामुळे जागतिक तेल संकटाचा धोका निर्माण झाला आहे. दरम्यान, इराणने मित्र देशांना होर्मुझच्या सामुद्रधुनीतून जाण्याची परवानगी देणार असल्याचे जाहीर केले आहे. इराणने भारतासह पाच देशांना सुरक्षित मार्ग उपलब्ध करून देणार असल्याचे म्हटले आहे. मात्र, शत्रू देशांना मार्ग देण्याचे कोणतेही कारण त्यांच्याकडे नाही.
जगातील महत्त्वाच्या तेल आणि वायू मार्गांपैकी एक असलेली होर्मुझची सामुद्रधुनी पूर्णपणे बंद झालेली नाही. इराणचे परराष्ट्र मंत्री अब्बास अराघची यांनी आज याविषयी बोलताना,”हा मार्ग केवळ मित्र देशांच्या जहाजांसाठी खुला आहे” असे स्पष्ट केले आहे.
अब्बास अराघची यांनी या मुद्द्यावर देशाची बाजू मांडताना, भारत, चीन, रशिया, इराक आणि पाकिस्तान यांसारख्या “मित्र देशांची” जहाजे होर्मुझमधून सुरक्षितपणे जाऊ शकतात, तर हा मार्ग शत्रू आणि त्यांच्या मित्र राष्ट्रांसाठी बंद आहे.
संयुक्त राष्ट्रप्रमुखांची चिंता Strait of Hormuz:
संयुक्त राष्ट्रांचे महासचिव अँटोनियो गुटेरेस यांनी परिस्थितीबद्दल गंभीर चिंता व्यक्त केली. सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवरील एका पोस्टमध्ये त्यांनी, होर्मुझची सामुद्रधुनी बंद झाल्यामुळे जगभरातील तेल, वायू आणि खतांच्या पुरवठ्यावर परिणाम होत आहे, ज्यामुळे इंधनाच्या किमती वाढत आहेत. गुटेरेस म्हणाले की, या वेळी कृषी हंगाम लांबणीवर टाकल्यास त्याचे गंभीर परिणाम होऊ शकतात आणि संघर्ष तात्काळ संपवणे हाच योग्य मार्ग आहे.”असे म्हणाले होते.
अमेरिका आणि इस्रायलला गुटेरेस यांचा संदेश Strait of Hormuz
महासचिवांनी अमेरिका आणि इस्रायलला इशारा दिला आहे की, युद्ध संपवण्याची वेळ आली आहे. त्यांनी इराणला, संघर्षात सामील नसलेल्या शेजारील देशांवरील हल्ले थांबवण्याचे आवाहनही केले. होर्मुझची सामुद्रधुनी जगातील सुमारे २०% तेल आणि वायू व्यापारासाठी अत्यंत महत्त्वाची आहे,जी इराणने प्रत्युत्तर म्हणून रोखली होती.
इराणने शांततेचा प्रस्ताव फेटाळला Strait of Hormuz
इराणने अमेरिकेच्या पाठिंब्याने सादर केलेला १५-कलमी शांतता प्रस्ताव (शांतता करार) फेटाळला आहे. इराणचे म्हणणे आहे की, युद्ध केवळ त्यांच्या अटींवरच संपेल. दरम्यान, अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी सांगितले की, इराणी नेत्यांसोबत चर्चा सुरू आहे आणि ते करारासाठी तयार आहेत, कारण त्यांना भीती आहे की, जर चर्चा अयशस्वी झाली, तर त्यांचेच लोक त्यांच्या विरोधात जाऊ शकतात.
होर्मुझमधून जाण्यासाठी परवानगी आवश्यक Strait of Hormuz:
इराणच्या संरक्षण परिषदेने नवीन नियम जारी केले आहेत. आता, कोणत्याही ‘अहिंसक’ जहाजाला होर्मुझमधून जाण्यापूर्वी इराणी अधिकाऱ्यांकडून परवानगी घेणे आवश्यक आहे. २५ मार्च रोजी, न्यूयॉर्कमधील इराणी मिशनने सांगितले की, इराणवरील कोणत्याही हल्ल्यात सामील नसलेले देश सुरक्षा नियमांचे पालन करून आणि परवानगी घेऊन होर्मुझच्या सामुद्रधुनीतून सुरक्षितपणे जाऊ शकतात.






